
बाल दिनानिमित्ताने आज कोशने रायगड जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी शालेय कर्मचारी यांच्या पुढाकाराने मुलांमध्ये शालेय खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुलांच्या चांगल्या सवयी वाईट सवयी तसेच स्वतःची स्वच्छता कशी राखायची व परिसर स्वच्छ कसे राहील याबद्दल माहिती देण्यात आली,
शालेय शिक्षकांचा आदर करणे तसेच त्यांनी दिलेल्या वेलो वेळी सूचनेचे पालन करणे आणि अभ्यास करणे याबद्दल शिक्षकांनी देखील माहिती दिली. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मुलांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या माध्यमातून माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले .जिल्हा परिषद शाळा पाली वाडी ,जिल्हा परिषद शाळा उमरोली तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा कोशाने या शालेय मधील विद्यार्थ्यांना मध्ये बालदिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील शिक्षकांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच कोशाने उमरोळी व पाळी,वाडीतल्या शिक्षिका माधुरी सालोखे मीनाक्षी गायकर व नीलम यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक , पालक ग्रामस्थ त्याचप्रमाणे प्रेरणा संस्थेच्या अश्विनीताई उपस्थित होत्या.
या शाळेतील सर्व मुलांन मध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . तसेच मुलांना बक्षिसे वितरण करून त्यांना खाऊ व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Post a Comment
0 Comments