Type Here to Get Search Results !

कर्जत रेल्वे स्थानकात ५४ वर्षीय व्यक्तीचा ट्रेन मधून पडून मृत्यू...

 

कर्जत प्रतिनिधी (सूरज चव्हाण) ; कर्जत रेल्वे स्टेशन वर आज दुर्देवी घटना घडली. मंगळवार दुपारी ३;१५ मी. कर्जत स्टेशन वर चेन्नई एक्स्प्रेस क्र. २२१५९ . मधून पडताना एका प्रवाशाचा दुर्देवी अपघात झाला आहे. प्रवासाच्या दरम्यान हे जनरल कोच मधून प्रवास करत होते प्लॅटफॉर्म वर उतरण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला आणि थेट ते प्लॅटफॉर्म व ट्रेनच्या दरम्यान पडले गेले असता त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
       मृत व्यक्तीच नाव भानुदास विठ्ठल खरात असे आहे वय ५४ वर्ष राहणारे समता नगर, पाटळी पाडा, घोडबंदर रोड, ठाणे, येथून प्रवास करत होते.
          मृतदेह पुढील पंचनाम्यासाठी कर्जत येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास कर्जत लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली  पीएसआय  आनंद लोखंड करत आहेत. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी प्रवाशांना  रेल्वे प्रवासात खबरदारी घेण्यात नियम पाळण्याची आव्हान केले आहे. तसेच मृताच्या नातेवाईकांना कलऊन त्यांच्या स्वाधिक केले जाईल तसेच अधिक तपास कर्जत लोहमार्ग पोलिस करत आहेत.

Post a Comment

0 Comments