Type Here to Get Search Results !

"दृष्यम"चित्रपट बघून, केले तिहेरी हत्याकांड... अखेर आरोपीस ठोकल्या बेड्या


कर्जत प्रतिनिधी. (प्रफुल जाधव) : पोशिर येथील तिहेरी हत्या प्रकरणी अखेर आरोपी सख्या भावानेच  हत्याकांड केल्याचे ऊघड झाले आहे.
   कर्जत तालुक्यातील चिकन पाडा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी कर्जत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी विचारपूस करता या निराधमाने अजय देवगण चा "दृषम"चित्रपट बघून या हत्येचा कट रचला गेल्याचे समोर आले आहे.
   चिकन पाडा गावाच्या हद्दीत पोशिरपाडा या भागातील मदन पाटील , अनिशा पाटील व विवेक पाटील, यांचा खून झाला असल्याचे रविवारी सकाळी निष्पन्न झाले आहे. हनुमंत पाटील असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
  बोरगाव येथील रहिवासी असलेल्या पाटील कुटुंब दोन सख्खे भाऊ, मदन पाटील व हनुमंत पाटील हे गेली पंधरा वर्षे चिकणपाडा  येथील पोशिरपाडा येथे स्वतःचे घर बांधून राहत होते. 
८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जे हत्याकांड घडले त्यात १० वर्षीय विवेक पाटील याचा मृतदेह नेरळ कळंब रस्त्याखाळून  वाहणाऱ्या नाल्यातील पाण्यात आढळून आले आहे. त्यांच्या नंतर ३० वर्षीय अनिषा पाटील  यांचा मृतदेह सुद्धा त्याच नाल्याखलील पाण्यात आढळून आले तसेच ३५ वर्षीय मदन जैतू पाटील  याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळून आला होता. मुंबई येथील जे जे रुग्णालयात सेव विच्छेदन करून आणलेल्या तिन्ही मृतदेहांवर बोरगाव येथील मूळगावी  अंतिम संस्कार करण्यात आले. या तिघांच्या हत्याकांड प्रकरणी आरोपी सख्खा भाऊ  हनुमंत जैतू पाटील याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या व अधिक तपास नेरळ पोलिस व कर्जत पोलिस करत आहेत..

Post a Comment

0 Comments