Type Here to Get Search Results !

कर्जत तालुक्यात तिहेरी हत्याकांड, एकाच कुटुंबातील पती, पत्नी, लहान मुलगा,, तर महिला गरोदर....


 कर्जत. प्रतिनिधी  ; कर्जत तालुक्यातील पोशिर येथील घटना.. एन गणपती मध्ये घडला तिहेरी हत्याकांड.. कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर, व कर्जत तालुका हादरला आहे. गणपतीच्या आगमनाने सर्वत्र ठिकाणी हा सण आनंदात खूप मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येतो, त्यातच नेरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एक तरुण, त्याची गर्भवती पत्नी व एक लहान मुलांचा मृतदेह आढलून आल्यामुळे या घटनेला तिहेरी हत्याकांड आहे की आत्महत्या ,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अज्ञात व्यक्तीकडून हत्या झाली की हे अख्ख कुटुंब आत्महत्येचा बली ठरल आहे, या मुळे तेथील पूर्ण परिसरातील वातावरनात खळबळ उडाली आहे, ही घटना गणपती उ उत्सवाच्या काळात घडल्यामुळे कर्जत तालुक्यात एकच खळबळ निर्माण झाली आहे, त्यामुळे स्थानिक नागरिक यांमध्ये तीव्र चिंता, दुःखाचे वातावरण आहे. अधिक तपास नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे   करत आहेत. या घटनेमागील नेमके कारण आणि सत्य समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे...

Post a Comment

0 Comments