Type Here to Get Search Results !

अर्धे घर नावावर करीत नाहीत म्हणून.... सख्या भावानेच संपविले भावाचे कुटुंब...


 कर्जत प्रतिनिधी ; (प्रफुल जाधव); शनिवार ७ सप्टेंबर गणपती बाप्पाच आगमण झाले. यावर्षी पहिल्यांदा पाटील बंधूंच्या घरात गणपती बाप्पा आणण्यात आला होता .रविवारी सकाळी दहा वाजता नेरळ कलंब रस्त्यावरील एका नाल्यात मदन पाटील याचा दहा वर्षाचा मुलगा विवेक याचा मृतदेह आढळून आला त्यानंतर स्थानिकांनी त्याच्या आई-वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्याच नाल्यात आई अनिशा पाटील यांचा मृतदेह आढळून आला समोरील दृश्य पाहून आदरणीय ग्रामस्थांनी पाटील बंधूंच्या घराकडे धाव घेतली मात्र घरात पाटील देखील रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्तेथ होते.
    सोन्यासारख्या सणात एका कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. मृतांमध्ये बालकासह एका सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा समावेश आहे.

      कर्जत तालुक्यातील नेरल कळंब राज्य मार्ग रस्त्यावर उशीर पाडा ही छोटी वस्ती असलेले गाव आहे. बोरगाव येथील चैतू पाटील यांनी पंधरा वर्षांपूर्वी पोशीर येथे घर बांधले, आणि ते कुटुंबासह तेथे राहू लागले जैतू पाटील यांना मदन व हनुमंत अशी दोन मुले होती दोन्ही मुलांचे लग्न लावून दिल्यानंतर ते पत्नीसह बोरगाव या मूळ गावी राहायला गेले .दोन भाऊ मदन व हनुमंत हे त्यांच्या कुटुंबासह पोशील येथे राहत होते हनुमंत हा गवंडी काम करायचा तर मदन पाटील याची पत्नी अनिषा या तेथे आरोग्य विभागात अशा सेविका म्हणून काम करत होत्या.

   वडिलांनी बांधलेले घर हे मदन यांच्या नावावर होते, आणि ही बाब हनुमंत याला खटकत होती वडिलांनी बांधलेल्या घराचा अर्धा भाग आपल्या नावावर करून द्यावा यासाठी हनुमंत आग्रही करत होता, यावरून तो अनेकदा मदन सोबत वाद घालत होता.

             शनिवारी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. त्यांनी देखील यावर्षी पहिल्यांदाच गणपती घरी आणला होता मात्र सोन्यासारख्या सणातच एका कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलीस उपअधीक्षक धुळदेव टेले हे देखील पोचले होते पोलिसांनी तिन्ही मृतदेह शेव विच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे ,या घटनेचा तपास निर्णय पोलीस करीत आहेत, दरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने भाऊ हनुमंत पाटील यांना संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास नेरळ पोलीस करत आहेत

Post a Comment

0 Comments