लाच देणे व लाच घेणे कायद्याने गुन्हा आहे. या बाबतीत नागरिकांनी जागृत आणि सतर्क राहणे गरजेचे आहे.
ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील उमरोळी गावामधील हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भ्रष्टाचार संदर्भात माहिती देण्यात आली तसेच आय डी बी आय बँकेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी देखील या बद्दल नागरिकांना जागृती निर्माण करून सतर्क राहण्याचे मार्गदर्शन केले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ऑल सोशल क्राइमकंट्रोल अँटी कॅरप्शन ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर साळोखे यांनी पटउन दिले आपण भ्रष्टाचार थांबवू शकतो ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. दक्षता जनजागृती कार्यक्रमात. बँकेचे होणारे गैर व्यवहार, मोबाईल वर येणारे ओटीपी, लिंक, इतरस्त व्यक्तीचे, किंवा अनोळखी व्यक्ती, कंपन्यांचे कॉल यांपासून सावधानगी बाळगावी. आपली माहिती गोपनीय ठेवून आपण सतर्क जबाबदार नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूच्या लोकांना ही माहिती द्वारे सतर्क राहण्याचे आवाहन केले पाहिजे.
तसेच आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून फ्री.के.वाय.सी.आणि झिरो बॅलन्स मध्ये बँक खाते खोलण्यात आले. या दक्षता जनजागृती कार्यक्रमास गावातील सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला व आदिवासी महिला वर्ग उपस्थित राहून सर्वांनी मिळून शपथ घेऊन कार्यक्रमास सहभागी झाले .
यावेळी अ.पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ऑल सोशल क्राइम कंट्रोल अँटी करप्शन ऑर्ग. राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे, बँक असिस्टान जनरल मॅनेजर राजू रंजन, ज्युनिअर असिस्टान मॅनेजर निशांत म्हैसने, क्लार्क वैभव क्षीरसागर,बँक कर्मचारी संभाजी रसाळ, रायगड जिल्हा सदस्य संतोष पवार,माजी सरपंच महादेव लोंगळे, माजी सरपंच लोंगले, नरेंद्र लोंगळे, सचिन लोंगले, समीर लोंगले, शिल्पा घारे. भावना घारे. माजी उप सरपंच गुलाब लोंगले, शालेय कर्मचारी माधुरी साळोखे, परेश लोंगले, गणेश लोंगले, सुनीता बुंधाटे, रामचंद्र घारे, विकास घारे,प्रवीण घारे, दिलीप लोंगले सुलोचना घारे, स्वप्नाली लोंगले, ग्रामस्थ उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments