Type Here to Get Search Results !

शारदा इंग्लिश मीडियम स्कूल डिकसल येथील शालेय विद्यार्थ्यांनमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती मार्गदर्श..


 आमली पदार्थ विरोधी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती.

(स्कूल  बॅग ही पुस्तकांनी भरलेली असावी  नााशेच्या पदार्थाने नाही)
आपल्या गुरूंच  मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचा आहे.


कर्जत प्रतिनिधी / शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल डिकसल, येथे आयोजित आमली पदार्थ विरोधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, शारदा इंग्लिश मिडीयम शाळेचे चेअरमन श्री सूरज ठाकूर, प्रिन्सिपल मॅडम किरण ठाकूर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

 शालेय विद्यार्थ्यांमध्ये आमली पदार्थ विरोधी जनजागृती करणे म्हणजे ही काळाची गरज आहे.

    संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे यांनी मुलांना आमली पदार्थ म्हणजे काय व त्याचे होणारे वाईट परिणाम व ते सेवन किंवा त्यांच्या आहारी गेल्याने शरीरात काय दुष्परिणाम होतात त्याच्या संदर्भात आज मार्गदर्शन केले तसेच वनविभागाचे पोलिस अधिकारी आनंदा पाटील यांनी मुलांना पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी काय प्रयत्न करावे आणि पर्यावरणाचे महत्व काय आहे याची माहिती मुलांना देण्यात आली .


   ही मोहीम राबवण्याचं एकमेव कारण की तरुण मुलांना सांगितल्यामुळे कुठेतरी ही तरुण पिढी मंोबाईल ऑनलाइन गेम, आणि पुढे जाऊन आमली पदार्थ पासून दूर राहतील आणि आपल्या परिवारातील कोणी सदस्य असे पदार्थ सेवन करत असेल तर त्यांना सेवन करू नये असा सल्ला देण्यात येत आहे., हभप.सुदेव महाराज बडेकर यांनी देखील संतांच्या काही ओव्यांमधून मुलांना आमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास शाळेतील १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आम्ही आमच्या घरी व आजूबाजूला ही या मोहिमेची जनजागृती निर्माण करू.असे विद्यार्थ्यांनी म्हटले.


   यावेळी अ.पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद.(आरक्षी) पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली  संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे , प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, वनविभाग पोलिस अधिकारी श्री अनंता पाटील, संपादक.जयेश जाधव पोलिस पाटील सौ सरिता गजानन शेळके, हभप श्री वासुदेव महाराज बडेकर, समाज भूषण भजन कार श्री.सचिन लोंगले जिल्हा सदस्य संतोष पवार व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments