कर्जत, २ ऑगस्ट:(जयेश जाधव) दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने औचित्य साधून तालुका विधी समिती कर्जत यांच्या वतीने कर्जत येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात " राष्ट्रासाठी मध्यस्थी"या विषयावर मार्गदर्शन विशेष मोहीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव श्रीमती तेजस्विनी निराळे, कर्जत कोर्टातील प्रमुख न्यायाधीश श्रीमती ए एस.वाडकर ,कर्जत कोर्टाचे सहन्यायाधीश श्रीमती श्रुती गंगवाल शहा, कर्जत बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड मनोज क्षिरसागर,वरिष्ठ विधीतज्ञ राजेंद्र निगुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव श्रीमती तेजस्विनी निराळे, यांनी मार्गदर्शन करताना लोकमान्य टिळकांची आठवण करून देऊन त्यांचे "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे , आणि तो मी मिळवणारच",या वाक्याप्रमाणेच माझे जीवन व आरोग्य स्वास्थ्य व उत्तम निरामय ठेवण्यासाठी कोर्टातील प्रकरणे मध्यस्थी करून मिटवण्याचा प्रयत्न करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे सांगितले. मध्यस्थी मोहीम ही १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तालुका न्यायालयापासून ते उच्च न्यायालयापर्यंत न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या पात्र प्रकरणांचा निपटारा करणे आणि वाद सोडविण्याच्या लोकाभिमुख पद्धती म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात मध्यस्थी पोहोचवणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
या विशेष मोहिमेचा पक्षकारांनी लाभ घ्यावा न्यायालयात प्रलंबित असणारे वाद मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी केले आहे .तर न्यायालयीन प्रक्रियेवरील ताण कमी करून प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने जलद निकाल मिळावा, यासाठी जिल्ह्यात १ जुलैपासून नव्वद दिवस 'राष्ट्रासाठी मध्यस्थी' ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा लाभ प्रलंबित खटल्यातील पक्षकारांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे आवाहन कर्जत कोर्टातील प्रमुख न्यायाधीश ए .एस.वाडकर यांनी केले.कर्जत कोर्टाचे सहन्यायाधीश श्रीमती श्रुती गंगवाल शहा यांनी सांगितले मध्यस्थी केवळ विचाराधीन विशिष्ट प्रकरणातच नव्हे तर इतर प्रकरणांमध्येही मोठ्या संख्येने खटल्यांचा न्यायालयांवरील भार कमी करून न्यायदानाला गती देऊ शकते.तर अॅड कैलास मोरे यांनी सांगितले आजही न्यायालयात पाच कोटी केसेस प्रलंबित आहेत त्यामुळे मध्यस्थीची गरज आहे.
कर्जत बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड मनोज क्षिरसागर यांनी मार्गदर्शन करताना मध्यस्थी प्रक्रियेमुळे वेळ आणि पैसा वाचतो न्यायालयीन विलंब टाळता येतो भविष्यातील वादांची शक्यता कमी होते कर्जत बार असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिलाच कार्यक्रम अडवोकेट मनोज क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आलेला आहे त्याचे कर्जत तालुका विधी समितीने कौतुक केले तर अॅड भाऊसाहेब मोरे यांनी संवादातून वाद मिटविणारी 'मीडिएशन फॉर द नेशन' विशेष मोहीम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम संवादातून वाद मिटवण्यासाठी आहे.
या कार्यक्रमासाठी अॅड एक पी.डिमेलो , अॅड नवीन बदले , अॅड अरुण नायक , अॅड आर बी पाटील , अॅड दीपक पादिर , अॅड गणेश बदले , अॅड प्रेम लोभी,एडवोकेट सुनंदा बोरकर, एडवोकेट प्रमिला चव्हाण, वकील व अनेक पक्षकार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट भाऊसाहेब मोरे यांनी केले तर अॅड संदीप घरत यांनी आभार मानले.

Post a Comment
0 Comments