कर्जत प्रतिनिधी /कर्जत तालुक्यातील नेरळ येथील ताडवाडी येथे बंद असलेल्या घरात ड्रग्स बनविण्याच्या कारखान्याचा नेरळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
स्थानिक ग्रामस्थांना त्या बंद असलेल्या घरात नव्याने आलेल्या भाडेकरूंकडून काहीतरी चुकीचे चालल्याचे दिसून आले. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. नंतर ट्रक्स कारखान्यावर नेरळ पोलिसांनी कारखान्यावर गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे
.
पाथरज ग्रामपंचायत मधील ताडवाडीत एका आदिवासी व्यक्तीचे घर आहे. ते घर मुंबई-धारावी येथील चार-पाच जणांनी भाड्याने घेतले. त्यानंतर 10ऑगस्टच्या मध्यरात्री त्या ठिकाणी एक मारुती ब्रिझा कारसोबत घेऊन आल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. मात्र, ते घर भाड्याने दिल्याने भाडेकरूंचे कोणी ओळखीचे आले असतील असे त्यांना वाटले. परंतु, मध्यरात्रीनंतर त्या घरामध्ये काही हालचाली ताडवाडी ग्रामस्थांनी पाहिल्या. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी मध्यरात्री दोन वाजता त्या माळरानावरील घराकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तेथे असलेले पाच तरुण हे वेगवगेळ्या लोखंडी डब्यांमध्ये काही द्रव्य वस्तू मिसळत असल्याचे आढळून आले. त्यात त्या सर्व साहित्याला उग्र वास येत असल्याने ग्रामस्थांनी तुम्ही हे काय करता आणि एवढ्या रात्री जागे राहून कोणते काम करीत आहात, असा प्रश्न केला. मात्र, घरात असलेल्या भाडेकरू व्यक्तींनी आदिवासी ग्रामस्थांवर अरेरावी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ग्रामस्थांनी त्या सर्व पाच जणांना पकडले आणि बेदम मारहाण केली. याबाबत ग्रामस्थांनी नेरळ पोलीस ठाण्याला कळवले. मध्यरात्री तीन वाजता नेरळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी असलेल्या वस्तू आणि साहित्य लक्षात घेऊन नेरळचे प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना त्या ठिकाणी बर्फाच्या लाद्या आणि रसायने पाहून हा ड्रॅग बनविण्याचा प्रकार असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी पंचनामा करून बंद असलेल्या घरातील नशिले पदार्थ बनविण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये एक तरुण हा डी फार्मसीपर्यंत शिक्षण घेतलेला आहे.

Post a Comment
0 Comments