भिसेगाव येथे बेकायदेशीर मातीचे उत्खनन केल्याप्रकरणी. हो पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया शिष्टमंडल आक्रमक , कर्जत तहसीलदार यांना दिले पत्रक,कारवाईची मागणी
कर्जत (प्रतिनिधी)
कर्जत नगरपरिषद हद्दीतील मौजे भिसेगाव डोंगर परिसरात विकासकाने गृहसंकुल प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डोंगर परिसरातील बेकायदेशीरपणे मातीचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले आहे त्यामुळे शासनाची लाखो रुपयांची राॅयल्टी बुडवून शासनाची फसवणूक केली आहे हि बाब शासनाच्या निदर्शनास आणून कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे अ.पोलीस सुरक्षा परिषद यांच्या शिष्टमंडळाने कर्जतचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे
अ.पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगले, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष प्रफुल्ल जाधव ,उत्तम ठोंबरे, शरद श्रीखंडे, रामदास तुपे, सूरज चव्हाण, संतोष पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव यांची भेट घेतली व चर्चा करून लेखी निवेदन सुपुर्द करण्यात आले.
त्यानी निवेदनात म्हटले आहे की, मौजे भिसेगाव येथील सिटी सर्वे, नं .761 या डोंगर परिसरात विकासाकाने गृह संकुल प्रकल्पासाठी शासनाची कुठल्याही प्रकारे परवानगी न घेता राजरोसपणे दिवसा ढवळ्या डोंगराळ भागाची माती जेसीपी पोकळन या मशीनच्या सहाय्याने हजारो ब्रास मातीचे उत्खनन केले आहे. या उत्खनन केलेल्या मातीचा भराव विविध कामांसाठी वापर केला असून सदरच्या विकासकाने यातून लाखों रुपये कमविले असून शासनाची लाखो रुपयांची राॅयल्टी बुडवून शासनाची घोर फसवणूक केली आहे .
प्रथमेश डेव्हलपर्स तर्फे विकासक तिवारी यांने मौजे भिसेगाव डोंगरालगत सिटी सर्वे नं. 761 परिसरात गृहसंकुल प्रकल्प उभारण्यासाठी या डोंगराचे सपाटीकरण करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मातीचे उत्खनन केले आहे सदर भागात विकासकाने खोदकाम करताना व तेथील जमिनीचे सपाटीकरण करतांना मोठ्या प्रमाणावर अनेक मौल्यवान वृक्षांची कत्तल केली आहे.या कत्तलीत अनेक पशू पक्षी यांची घरे नष्ट झाली आहे. त्यामुळे अनेक वृक्षप्रेमी व पशु पक्षी प्रेमीमध्ये नाराजी आहे साहजिकच मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा समतोल बिघडवला आहे.परिणामी पर्यावरणाची हानी झाली आहे.या हानीस प्रथमेश डेव्हलर्स तर्फे तिवारी हा एकमेव विकासक जबाबदार आहे असेही नमूद केले आहे सदरच्या विकासकाने शासनाची लाखो रुपयांची राॅयल्टी बुडवून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला आहे.तरी या तक्रारीची निवेदनाद्वारे तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन विकासाकावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे .

Post a Comment
0 Comments