१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा बेकरेवाडी व रायगड जिल्हा परिषद शाळा आसल वाडी येथील शालेय विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
स्वतंत्र दिनाचे अवचित्य साधून शाळेतील मुलानी छान छान भाषणे सादर केली. तसेच परीक्षेत, प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक आलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आले, संघटनेच्या वतीने सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, यांना १५ ऑगस्ट दिनाच्या शुभेच्छा देऊन , थोडक्यात स्वतंत्र दिनाची माहिती देण्यात आली ज्यांनी आपल्याला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले.
स्वातंत्र्य हा केवळ एक अधिकार नव्हे तर ती एक जबाबदारी देखील आहे.किती तरी क्रांतिवीराणी आपले रक्त आपल्या भारत मातेसाठी अर्पण केले . आजचा दिवस म्हणजे आपल्या देशाच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण आजच्या दिवशी 1947 साली* कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र मिळाले.तेव्हा आपला भारत देश स्वातंत्र्य झाला म्हणून आज आपण स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा करत आहोत, तसेच पालक आणि मुलांमध्ये आमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली त्या नंतर सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य, वह्या, पेन्सिल रबर, शॉपनर, पट्टी, त्याच प्रमाणे बिस्कीट, चिप्स, चॉकलेट, केक, ई.वाटप करण्यात आले. यावेळी गावातील महिला, पालकवर्ग शिक्षक सर्व उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे, महाराष्ट्र कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले, प्रदेश युवक अध्यक्ष सुप्रेश सालोखे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव, जिल्हा सदस्य संतोष सकपाल, श्री राजू सिन्हा,तालुका सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी, श्री मोहित सिंग, वीलास सांबरी, संतोष सांबरी,रमेश सांबरी,चंद्रकांत सांबरी,पांडू साबरी,शिवराम सांबरी,रुपेश निरगुडा इत्यादी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments