खांडस गावातील ऐणकर कुटुंबाच्या घरावर झाड पडून मोठे नुकसान... कोणतीही जीवीत हानी नाही..
तालुक्यात पावसाची हजेरी जोरदार सुरु झाल्यानंतर काही ठिकाणी पावसाचे पाणी शिरले काहींच्या घराचे नुकसान अश्याच अतिवृष्टी मुळे आणि जोराच्या वादळी वाऱ्यामुळे कर्जत तालुक्यातील खांडस गावातील रहिवाशी ऐनकर कुटुंबाच्या घरावर झाड पडून खूप मोठे नुकसान झाले आहे.
गावातील जीर्ण अवस्थेत असलेले पिंपळाचे झाड घरावर कोसळून घराचे खूप मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. तर ऐनकर कुटुंबाच्या तीन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जगदीश पुंडलिक ऐनकर यांच्या घरासमोर हे झाड अनेक महिन्यांपासून धोकादायक अवस्थेत होते . दोन वर्षांपूर्वी झाडाच्या काही फांद्या त्यांच्या घरावर पडून नुकसान झाले होते.
त्या नंतर त्यांनी खांडस ग्राम पंचायतीकडे वारंवार लेखी तक्रार करून झाडे तोडण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाने वेळेवर उपाय योजना न केल्याने ही दुर्घटना घडली आहे.
घरावरती झाड कोसळून घरची दयनीय अवस्था झाली आहे, भिंतीना तडे गेले, छपरा तुटून खाली पडले आहे खूप आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने घरातील सर्वजण घरा बाहेर असल्याने काही हानी झाली नाही.
संतप्त ऐनकर कुटुंबाने प्रशासनाच्या या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. आणि लवकरात लवकर पंचनामा करून भरपाई मिळावी यासाठी मागणी केली आहे.

Post a Comment
0 Comments