Type Here to Get Search Results !

आषाढी एकादशी निमित्ताने डिक्सल अंगणवाडीतील शाळेत भक्ती मे वातावरण, पालकांची उपस्थितीत लहानग्यांनी घेरलं रिंगण..

  आषाढी वारी म्हणजे भक्ती आणि सांस्कृतिक चा दिव्य सोहळा शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा असलेली आषाढी वारी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रतीक आहे 

महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी दरवर्षी भक्तिभावाने आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पाई पंढरपूरला येत असतात. 


  हा केवळ एक प्रवास नसून आत्मशुद्धीचा आणि समर्पणाचा सोहळा आहे. 

  आषाढी एकादशीच्या निमित्ताने डिकसल अंगणवाडी मध्ये आषाढी एकादशी आनंदात साजरी करण्यात आली.

 आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात विविध भागातून वारकरी भक्ती भावाने सहभागी होत असतात. पांडुरंगाच्या दर्शनाची खास लागलेले हे भक्तगण वाऱ्याच्या माध्यमातून आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेत पांडुरंग चरणी दिन होतात. अशा या भक्तीमय वातावरणात आज डिक्सल अंगणवाडीतील मुलांनी रिंगण करून ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत तुळशीला प्रदक्षिणा घालून आषाढी एकादशी सोहळा आनंदात साजरा केला.

  हा सोहळा संप्या नॉनंतर गणवाडीतील शालेय मुलांना राजगिरा लाडू ,केली, साबुदाणा वडा ,फराळ, देण्यात आला. यावेळी पालकांचीही उपस्थिती होती. अंगणवाडी सेविका म्हणून माधुरी गणेश पांगत, मदतनीस अरुणा सखाराम भासे, सदस्य संध्या दीपक पाटील, यांसमवेत सौ माधुरी मोहन सालाखे, सौ सुषमा अशोक पाटील, सौ मोनिका निशांत पाटील, सौ संध्या विकास भासे, सौ साधना किरण भासे, सौ उषा सुशांत पाटील, सौ रोशनी अनंत भासे, सौ स्वाती मोहन पवार, सौ प्रेक्षा सुनील बांगर, आधी पालक  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments