कर्जत तालुक्यातील धक्कादायक घटना अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले असल्याचे समोर आली आहे .
4 जुलै कर्जत तालुक्यातील पाथरज खोंडेवाडी येथील 15 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जाण्यासाठी म्हणून घरातून सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास निघाली.
कशेले येथील ज्ञान अनुभव विद्यालय अकॅडमी आणि डेव्हलपमेंट सायन्स येथे ही पीडित मुलगी शिक्षण घेत होती. शाळेत गेलेली ही मुलगी सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने पीडित मुलीच्या पालकांनी कर्जत पोलीस स्टेशन कडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली आहे.
मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला फुस लावून अज्ञान इसमाने पळउन नेण्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत कर्जत पोलीस पोलीस अज्ञान इसमाचा शोध घेत आहेत. भारतीय न्याय संहिता कलम (137) 2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास साहेब व कर्जत पोलिस टीम करत आहेत.

Post a Comment
0 Comments