कर्जत प्रतिनिधी/ कर्जत तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी डोंगर माथ्यावर झाडी झुडपात वसलेले गाव आसंल वाडी, दुर्गम भागातील हे गाव.
अखंड पोलिस मित्र सुरक्षा परिषद आणि हिंद.पोलिस फ्रेन्ड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेच्या वतीने रा.जि.परिषद शाळेला भेट देण्यात आली.
शालेय विद्यार्थ्यांची समस्या दूर करण्यात आली असून आसंल वाडी रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत संघटनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची जेवण बनवण्यासाठी गैर सोय होत असल्यामुळे त्यांना नवीन गॅस शेगडी देण्यात आली. त्याच प्रमाणे बेकरे वाडीतील जिल्हा परीषद शाळेत देखील शिैक्षणिक साहित्य व मुलांना नाष्टा, व बटाटे वेफर्स, केळी, बिस्कीट, देण्यात आले .
संघटनेचे संतोष यादव यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आता मुलांनी जास्त वेळ जेवणाचून वंचित राहता येणार नाही.मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला सांगून गेला की असेच कार्यक्रम या पुढे देखील करण्यात यावे शालेय मुख्याध्यापक श्री यांनी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले, यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश रतन लोंगळे, सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी, संतोष यादव, विलास सांबरी ग्रामस्थ व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


Post a Comment
0 Comments