Type Here to Get Search Results !

आमली पदार्थ विरोधी जनजागृती संघटनेच्या शिष्ट मंडलाने श्री सुशांत पाटील गटविकास अधिकारी यांची घेतली भेट.


    संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशामध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे या बाबतीत तत्कालीन लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब व शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.
  या जनजागृती कार्यक्रमामुळे शाळेतील शिक्षकांकडून संघटनेचं कौतुक केलं जात आहे आणि मुलं आपल्या घरी देखील या माहितीचा प्रसार करत आहेत.
   अमली पदार्थ विरोधी जनजागृती संदर्भात लवकरच मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ.

कर्जत / प्रतिनिधी/  :  गट  विकास अधिकारी पंचायत समिती कर्जत (BDO) श्री.सुशांत पाटील साहेब यांना पत्रक देऊन संपूर्ण कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा व विद्यालय,महाविद्यालय, इंग्लिश मिडीयम शाळा यांमध्ये आमली पदार्थ विरोधी जनजागृतीची मोहीम राबविण्यात येत असल्याचे संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

  आमली पदार्थ विरोधी काम करणे म्हणजे खूपच महत्त्वाचे कार्य आहे आणि या कार्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनि आसंल वाडी, बेकरे वाडी, माणगाव वाडी, आंबिवली, माणगाव, डिकसल ,उमरोळी,कोशाने, राऊत विद्यालय,आश्रमशाळा, यांमध्ये जनजागृती करण्यात आली परंतु अशा काही ठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते पोहचू शकत नाहीत त्या ठिकाणी या मोहिमेचे महत्व समजणे विद्यार्थ्यांसाठी खूप आवश्यक आहे त्यामुळे संघटनेच्या शिष्ट मंडळाने गट विकास अधिकारी यांची भेट घेऊन सर्व माहिती सांगण्यात आली. 

 अमली पदार्थ विरोधी जनजागृती व्हावी ही माहिती साहेबांना समजताच लगेचच कोणताही विलंब न लावता तालुक्यातील सर्व शाळांना या आमली पदार्थांपासून विद्यार्थ्यांन मध्ये जनजागृती व्हावी या साठी सूचना देण्यात आल्या.हे कार्य खूप महत्त्वाचे आणि चांगलं आहे त्या साठी काहीही सहकार्य लागले तर ते सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले. आपण करत असलेल्या या समाज कार्यासाठी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांना देखिल पत्र पाठवण्यात आले असून लवकरच या जनजागृती कार्याची माहिती संपूर्ण रायगड जिल्ह्यात केली जाईल. या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होऊन आपोआप अमली पदार्थाचे सेवन न करणे हे आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे आपल्या मुलांना  याची जाणीव होऊन तरुण पिढीला चांगला मार्ग दाखवण्याचे काम संघटना करत आहे.


    यावेळी अ.पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद.( आरक्षी) पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली. संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले यांच्या उपस्थितीत. जेष्ठ पत्रकार श्री जयेश जाधव,प्रदेश सल्लागार उत्तमभाई ठोंबरे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव, जिल्हा सदस्य शरद श्रीखंडे, जिल्हा सदस्य संतोष पवार, युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, कर्जत तालुका रामदास तुपे, सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी, विलास सांबरी, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments