रायगड जिल्हा परिषद शाळा किरवली येथे अमली पदार्थ विरोधी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती .
कर्जत./प्रतिनिधी /. पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद..(आरक्षी) पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या विद्यमानाने कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा किरवली येथे मुलांना अमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून विद्येची देवता सरस्वती माता आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
अमली पदार्थ सेवन केल्याने होणारे वाईट परिणाम आणि त्यामुळे आपल्या शरीराला व आपल्या जीवनावर ,कुटुंबावर आणि शिक्षणावर होणारे दुष्परिणाम याबद्दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे यांनी माहिती सांगितली तसेच महाराष्ट्र शासन वनविभाग अधिकारी श्री अनंता पाटील सर यांनी देखील पर्यावरण संतुलन आणि पर्यावरणाचे रक्षण करणे याबद्दल मुलांमध्ये जनजागृती करण्यात आली.
मान्यवरांनी दिलेली माहिती मुलांनी शांत पणे ऐकून घेतली तसेच आपल्या घरातील सदस्यांना देखील अमली पदार्थ विरोधी माहिती देऊ असे मुलांनीही या कार्यक्रमात उद्गार काढले.
शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मान्यवरांचा सत्कार व आभार मानण्यात आले. शाळेतील शिक्षकांनी सुद्धा या कार्यक्रमाचे आभार मानले.
यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रियंका प्रदीप हरवंदे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र शासन वनविभाग अधिकारी श्री अनंता पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रतन लोंगले, रायगड जिल्हा सदस्य संतोष पवार, त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष प्रकाश बडेकर, हभप महाराज वासुदेव बडेकर, तसेच उपशिक्षिका श्रीमती चित्रा किशोर पाटील, उपशिक्षिका सौ वैशाली रुपेश पाटील, विषय शिक्षक श्री आकाराम तुकाराम पाटील, विषय शिक्षक श्री राजेंद्र सोपान रुपनवर. इत्यादी उपस्थित होते



Post a Comment
0 Comments