*अ.पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद (आरक्षी) पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली*
*आमली पदार्था विरोधी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती*
कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या आसल वाडी, बेकरे वाडी, माणगाव, आंबिवली, बेकरे, डिकसल , उमरोली, कोशाने, इत्यादी रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आमली पदार्थ विरोधी संघटनेच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक यांनी खरोखर आपण खूप चांगल्या विचारांनी प्रयत्न करून जनजागृती करत आहात हे खूप महत्त्वाचे आहे, त्यात आताच्या तरुण पिढीला ही माहिती देऊन मुलांचे आयुष्य बदलून जाणार असल्याचे सांगितले गेले.विद्यार्थ्यांमध्ये जन जागृती झाली म्हणजे आपल्या पालकांपर्यंत आपोआप ही माहिती पोहचू शकते, आमली पदार्थापासून दूर राहिल्यामुळे कोणी शिक्षापासून वंचित राहता येणार नाही खूप अभ्यास करून मोठे शिक्षण घेऊन कोणी डॉक्टर, पोलिस, सैनिक, शिक्षक, किंवा मोठ्या हुद्द्यावर पोहचू शकतो.
1) आमळी पदार्थ सेवन करणे टाळा.
२) आमली पदार्थ सेवनाने संपूर्ण कुटुंब व जीवन उद्ध्वस्त नष्ट होते.
३) व्यसनामुळे जीवन उदासीन होते आणि गुन्हेगारीकडे वाटचाल सुरू होते.
४) नशेच्या अधिक जाऊन वाईट कृत्याकडे वाटचाल केली जाते.
५) आमली पदार्थ सेवनामुळे शिक्षणाकडील उज्वल भविष्याची स्वप्ने नष्ट होतात.
६) आपले जीवन वाचवा आमली पदार्थ सेवन टाळा.आमली पदार्थाचे सेवन न करता मुलांनो आपण शिक्षणाकडे भर देऊन आपले भविष्य निर्माण करावे,
*आमली पदार्थ सेवन करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे यांचं वक्तव्य*
या वेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशोर शितोळे, प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगले, संपादक श्री जयेश जाधव,प्रदेश सल्लागार उत्तम भाई ठोंबरे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव, जिल्हा सदस्य संतोष पवार, तालुका युवक अध्यक्ष सुरज चव्हाण, संतोष यादव, अंकुश ठोंबरे. सचिन लंगले, मुख्याध्यापक श्री ,कावरे सर ,श्री,धंद्रे सर, श्री . महाजन सर, मुख्याध्यापिका सौ शारदा एकनाथ सावले, शितल रावसाहेब माने, मोनिका चंद्रकांत कोहोकडे सौ. सुनिता संजय वाघमारे इं उपस्थित होते....


Post a Comment
0 Comments