Type Here to Get Search Results !

कर्जतच्या नवीन पोलिस निरीक्षकांच संघाटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत..

 

कर्जत पोलिस निरीक्षक पदी श्री संदीप भोसले यांची नियुक्ती...

     कर्जत पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांची अलिबाग येथे बदली झाल्यामुले त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर श्री संदीप भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

     श्री.संदीप भोसले हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत होते . कर्जत पोलिस ठाण्याचे नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.

 त्यामुळे तालुक्यातिळ तळागाळात आणि नागिकांच्या व पोळीिसांच्या मदतीला धावून जाणारी एकमेव संघटना पोलिस सुरक्षा परीषद ऑफ इंडिया व हिंद.. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली या संघाटनेचा उल्लेख केला जातो. 

  अखंड पोलिस सुरक्षा परिषद इंडिया व हिंद.. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली या संघटनेच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी नावीन नियुक्त  वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना मायेची उबदार शाल व पुष्प गुच्छ देऊन त्याचं स्वागत केले त्याच प्रमाणे कर्जत मधील काही समस्यांवर चर्चा देखील करण्यात आली. यावेळी संपादक जयेश जाधव, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगळे, प्रदेश सल्लागार उत्तमभाई ठोंबरे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु. प्रफुल जाधव, जिल्हा सदस्य संतोष पवार, कर्जत तालुका युवक अध्यक्ष कु. सूरज जाधव, आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments