*रायगड जिल्हा युवक अध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध ार्यक्रमाचे आयोजन*
जिल्हा युवक अध्यक्ष कु. प्रफुल जाधव यांचा वाढदिवस किनारा अनाथ आश्रमात साजरा*
कर्जत प्रतिनिधी./ *रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु. प्रफुल जाधव यांचा वाढदिवस किनारा अनाथ आश्रमात साजरा*
वार मंगळवार दि.01जुलै 2025रोजी दुपारी ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथे अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद (आरक्षि) पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु. प्रफुल जाधव यांचा वाढदिवस किनारा आश्रमात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरच आलेल्या वांगणी येथील आश्रमात संघटनेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
रायगड जिल्ह्यात आणि कर्जत खालापूर पेण तालुका अंतर्गत दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवीन नवीन उपक्रम राबवत असतात.
समाज सेवेचा वसा घेऊन आपले समाज कार्य संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात,तालुक्यात, गावात,वस्तीत, पोचवत आहेत. त्यांच्या या कार्या बद्दल प्रफुल यांना संघटनेच्या वतीने "समाज भूषण" पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.
आपल्या या कार्याचा डंका ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथील आश्रमातील लहान मुलांच्या सोबत वाढदिवस साजरा करून मुलांना जेवणाच राशन आणि नाष्टा, ज्यूस, देण्यात आले तसेच काही वेळ त्यांच्या सोबत घालून खूप आगळ वेगळं जाणवलं
यावेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी संघटनेचे जिल्हा सदस्य श्री संतोष पवार, कर्जत तालुका युवक अध्यक्ष कु सूरज चव्हाण, युवक अध्यक्षा कु.प्राची जाधव, सह सचिव कु. वैभव तांडेल, कु. विद्या कांबरी, कु. पौर्णिमा कांबरी


Post a Comment
0 Comments