कर्जत प्रतिनिधी./संतोष पवार :
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे"पर्यावरण दिनाच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्यभिषेक दिना निमित्ताने व ऐकता लोंगळे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.
५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बदलत्या हवामाना विषयी भविष्यात पर्यावरणाचे प्रदूषणाचे प्रश्न कमी व्हावेत याकरिता संपूर्ण जग एकत्र येऊन ठोस भूमिका घ्यायची गरज आहे. म्हणजेच बदलत्या हवामानामुळे मानवी जीवन व निसर्गाचा होणारा ह्वास याने वसुंधरेला धोखा पोहोचवणार आहे.
वास्तविक या अर्धशतकात हवामानाबदल, वाढते प्रदूषण पर्यावरणाचा व वन्यजीवांचा रहास अश्या विविध बाबींवर धोरणात्मक निर्णय आणि चर्चेपेक्षा प्रत्यक्ष कृती केली पाहिजे.
अतिवृष्टी , जमिनीचे उत्खनन,आवर्षन आणि दुष्काळ .. बदलत्या हवामानाचे आणि पर्यावरण ऱ्हासाचे परिणाम वेगवेगळ्या रूपांत आपल्यासमोर येत आहेत.
या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद (आरक्षी)पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे आपण आपल्या परिसरात किमान ५ तरी झाडे लावली पाहिजेत आणि ती जगवली पण पाहिजेत.
*संस्थापक श्री ज्ञानेश्वर साळोखे*
गेली अनेक वर्षे आम्ही वृक्ष लागवड करत आहोत आणि त्यांचं संगोपन देखील करत असतो."निसर्ग टिकावा , वाढावा,अशी आस आहे. आपल्या सोबत आपल्या मुलांच्या डोक्यावरील हिरवी सावली रहावी. याची जाणीव रुजते आहे. या निमित्ताने आज पर्यावरणाच्या दृष्टीने आणि हवामानाच्या बदलामुळे वृक्षारोपण करण्याची आवश्यकता आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले, प्रदेश ज्येष्ठ सल्लागार श्री उत्तमदादा ठोंबरे, रा.जिल्हा सदस्य श्री संतोष पवार, ता.युवक अध्यक्ष कॉ.कक्ष.कु पारस साळोखे, सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी, सदस्य शांताराम मिरकुटे, ता. सदस्य दिनेश कांबरी,


Post a Comment
0 Comments