वयाच्या ८ व्या वर्षी. कु ऐकता लोंगळे हिने वाढदिवसच्या निमित्ताने केले वृक्षारोपण,
" जगनारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता,पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेनी हाथ फिरवणारा तो आपला शिवबा होता " . रयतेच्या राज्याला मानाचा मुजरा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक .छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्यभिषेक दिना निमित्ताने. जय शिवराय...
कु. ऐकता रतन लोंगळे हिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक आगळी वेगळी संकल्पना रुजवली आहे . समाजात सर्वच लोक आपला वाढदिवस साजरे करत असतात परंतु या लहानग्या मुलीनी जे केले ते खूप काही सांगून जाते, काळाची गरज, ज्या वेळी कोरोणा नी जगात डोकं वर करून लोकांच जगणं कठीण केले होते, लोक ओक्सिजन विकत घेऊन आपला डॉक्टरी उपाय करत होते, परंतु जर या मुली प्रमाणे नागरिकांनी झाडे लावली तर या गोष्टीवर समाधान व्यक्त केला जाऊ शकतो. आज कु. ऐकता लोंगळे हिने समाजाला दाखऊन दिले आहे. मोठ्या मोठ्या पार्ट्या करून वाढदिवस साजरा करण्या पेक्षा झाड लावून वाढदिवस साजरा करणे योग्य आहे.
वडिल रतन लोंगले,हे सुद्धा अनेक वर्षे समाजकार्य करून आपले कार्य समाजापुढे घेऊन जात आहेत तोच आदर्श डोळ्या समोर ठेऊन त्यांची मुलगी पावलावर पाऊल ठेवून तिने देखील समाजकार्यात सहभाग घेऊन कु ऐकता हिने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.
नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे आपण आपल्या परिसरात किमान ५ तरी झाडे लावली पाहिजेत . या निमित्ताने आज पर्यावरणाच्या दृष्टीने आणि हवामानाच्या बदलामुळे वृक्षारोपण करण्याची आवश्यकता आहे. यावेळी अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले, प्रदेश ज्येष्ठ सल्लागार श्री उत्तमदादा ठोंबरे, उद्योजक जयवंत लोंगळे,, रा.जिल्हा सदस्य श्री संतोष पवार, ता.युवक अध्यक्ष कॉ.कक्ष.कु पारस साळोखे, सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी, सदस्य शांताराम मिरकुटे, ता. सदस्य दिनेश कांबरी, आदी उपस्थित होते..


Post a Comment
0 Comments