रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे याची अखंड पोलीस मित्र सुरक्षा परिषद आॅफ इंडिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अलिबाग पोलिस अधीक्षक रायगड अलिबाग कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
संघटनेचे कार्य आणि मुख्य उद्देश समाजात पोलिसांसाठी काम आणि सामाजिक कार्य त्याच प्रमाणे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल असलेली जी समज,गैरसमज, पोलिसांसाठी, नागरिकांसाठी मेडिकल कँप, यांसारखे अनेक उपक्रम यांवर चर्चा करण्यात आली.
रायगड जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे यांचा शाल , पुष्पगुछे देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, कर्जत प्रभात न्युज पेपर संपादक श्री जयेशजी जाधव, प्रदेश सल्लागार अॅड. उमेश भगत, रा. जिल्हा सदस्य श्री संतोष पवार, उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments