दि.१७ जून मंगळवार, नेहमीसारखे सकाळी लवकर कामावर जात असताना माणगाव येथील तरुण सुधीर सोनवणे हे भिवपुरी रोड रेल्वे ते मुंबई च्या दिशेने कामासाठी जात होते सदर भिवपुरी रेल्वे स्थानकातील लिफ्ट मधून जात असताना ती लिफ्ट सकाळी ९: १० ते ९:३५ पर्यंत या सुमारास अडकले होते. त्याला बाहेर काढण्यासाठी कोणतीही मदत मिळाली नाही. नुकताच काही दीिवसांपूर्वी लोकल ट्रेन आणि एक्सप्रेस मध्ये अपंघात झाला होता, आणि त्या अपघातात काहीना आपाला जीव गमवाया लागला होता . त्या मुले असेच काही प्रकार घडू नयेत.
त्या ठिकाणी , गार्ड. सुद्धा नाही, या त्रासाचा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आणि कामावर जाण्यासही उशीर झाल्याने ते त्रस्त झाले होते. काही वेळेच्या नंतर त्यांची सुटका झाली. परंतु रेल्वे प्रवासी वाहतूक साठी अश्या प्रकारे लिफ्ट बंद असणे हे योग्य नाही कारण भिवपुरी रोड रेल्वे स्थानकावर आता मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करत असून या ठिकाणी अशी घटना घडणे योग्य नाही, या संदर्भात भिवपुरी रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष श्री किशोरजी गायकवाड यांच्या कडे सर्व प्रकारची माहिती देऊन आणि या पुढे लिफ्ट बंद होऊ नये यासाठी प्रवासी संघटनेकडे दाद मागितली आहे.
सोनवणे यांनी आपलं म्हणणं व्यक्त केले आहे की जर त्या ठिकाणी एखादा जेष्ठ नागरिक व्यक्ती,महिला असे कोणी असत तर नक्कीच मोठी घटना घडली असती.. म्हणून भिवपूरी रोड रेल्वे स्थानकात अस घडू नये.

Post a Comment
0 Comments