सावरगाव येथील श्री चेडोबा व कालिका मातेच्या जागृत देवस्थानात वटपौर्णिमेनिमित्त भाविकांची दर्शनाला मोठी गर्दी.
माघ पौर्णिमेपूर्वी दर महिन्याला धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; आज हरिपाठ, महाआरती आणि महाप्रसादाने परिसरात भक्तिभावाचे वातावरण
कर्जत तालुक्यातील सावरगाव येथील श्री चेडोबा देवस्थान व स्वयंभू कालिका माता हे भव्य आणि दिव्य असे जागृत स्थान भाविकांसाठी आस्था व श्रद्धेचे केंद्रबिंदू ठरले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमधूनही असंख्य भक्त या पवित्र स्थळी दर्शनासाठी दरवर्षी येत असतात.
येथे महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. वर्षभरात 11 पौर्णिमा साजऱ्या केल्या जातात, तर 12वी पौर्णिमा म्हणजे माघ शुद्ध पौर्णिमा, या दिवशी विशेष महाउत्सव पार पडतो.
आज वटपौर्णिमा निमित्त देवस्थानात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने श्री चेडोबा व कालिका मातेचे दर्शन घेतले. यानिमित्ताने हरिपाठ, महाआरती व महाप्रसाद यासारखे धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.
आजच्या कार्यक्रमाचे यजमानपद श्री गजानन शिवराम खडे मांडवणे आणि सौ. सुलभा गजानन खडे यांनी भूषवले. हरिपाठ सेवा दिलीप महाराज राणे, दत्तात्रेय श्रीखंडे महाराज, तानाजी काळोखे, सदा बुवा जाधव, शरद बुवा शिंदे यांच्यातर्फे संपन्न झाली. या धार्मिक सोहळ्याला उपस्थित अनेक भाविकांनी भक्तिभावाने सहभाग नोंदवला.

Post a Comment
0 Comments