अ.पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद.. आरक्षी पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेचे कर्जत तालुका युवक अध्यक्ष यांना अगला वेगळा वाढदिवस साजरा.आदिवासी भागातील मुलांसोबत केला साजरा वाढदिवस. मुलांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण. चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्व राजकीय, सामाजिक, क्रीडा, शासकीय, निमशासकीय, मित्र मंडळी नातेवाईक अश्या अनेक स्थरावरून केलं जातं आहे... असा हा आगळा वेगळा वाढदिवस.
कर्जत प्रतिनिधी/;
अ.पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया तालुका युवक अध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उमरोली येथील आदिवासी वाडीतील विद्यार्थ्यानं सोबत आपला वाढदिवस साजरा करण्यात आला.
या वाढदिवसाच्या अगल्या वेगळ्या कार्यक्रमा मुले मुलांमध्ये आनंद निर्माण झाला होता, उमरोली गावातील आदिवासी समाज मंदिरात मुलांना एकत्र करून त्यांना प्रथम नाष्टा व खाऊ वाटप करण्यात आले. समाज भूषण पुरस्कार सचिनबुवा लोंगळे यांच्या वतीने सूरज चव्हाण यांचं स्वागत करण्यात आले, त्या नंतर मुलांना संघटनेचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले, शालेय विद्यार्थी यांना सध्या सुट्ट्या लागल्या असल्यामुळे मूळ सगळीकडेच सुट्टीचा आनंद घेत आणि त्यातच मुलांना शाळेत उपयुक्त साहित्य वाटप करण्याच कारण म्हणजे सुट्टीत देखील मुलांनी लेखणीचा सराव करावा या संकल्पनेने आज अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेच्या माध्यमातून तालुका युवक अध्यक्ष कु सूरज चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, समाज भूषण पुरस्कार सचिन बुवा लोंगळे, सदस्य संतोष पवार, कुमार कांबरी, सुशांत चव्हाण,आणि पालक उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments