महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कर्जत लोहमार्ग पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी आरपीएफ सफाई कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
१ मे हा केवळ महाराष्ट्र दिन नसून तू आपल्या अस्मितेचा संस्कृतीचा आणि बलिदानाचा दिवस आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. त्यांच्या त्यागातून आणि संघर्षातून आपल्या राज्याची स्थापना झाली. आजचा दिवस त्या सर्व ज्ञात,अज्ञात हुतात्म्यांना कृतज्ञतेने अभिवादन करण्याचा आहे. त्यांच्या पराक्रमामुळे आपल्याला आपला महाराष्ट्र मिळाला. मराठी भाषेचा संस्कृतीचा आणि आत्मसन्मानाचा जयघोष करण्याचा हा दिवस. म्हणून १ मे रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता पर्यंत कर्जत लोहमार्ग पोलीस ठाणे येथे पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शिबिरात पोलीस कर्मचारी सफाई कर्मचारी आरपीएफ यांनी सहभाग घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे व पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन पोलिस स्टेशन गेस्ट रूम मध्ये करण्यात आले होते.
यावेळी माधवबाग तर्फे डॉक्टर बन्सीलाल पाटील डॉक्टर विशाल बनसोडे तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव, सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी ,या वेळी उपस्थित होते. .


Post a Comment
0 Comments