Type Here to Get Search Results !

डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुले , उपचार दरम्यान मृत्यू... कर्जत तालुक्यातील कशेले ग्रामीण रुग्णालयातील घटना...


 *कर्जत प्रतिनिधी / कर्जतची खान .;

खांडस ग्रामपंचायत हद्दीतील भावंड वाडी येथील तुकाराम गिरजू  गावंडा याचा सरकारी रुग्णालयात उपचार अभावी मृत्यू झाल्याचा आरोप तुकाराम यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

तुकाराम यांना अशक्तपणा जाणवल्याने त्यांना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता कशाला येतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी तब्बल दोन तास कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याचा आरोप गावंडा कुटुंबाने केला आहे. डॉक्टरांनी साडेदहा वाजता रक्त तपासणी केली, पण त्यानंतरही उपचार सुरू झाले नाहीत. रुग्णाची प्रकृती गंभीर झाली तेव्हा डॉक्टरांनी लक्ष दिले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्यातच तुकाराम यांचा मृत्यू झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.

खूप छान आवाज ही मृत्यू झाल्याचा आरोप तुकाराम यांच्या नातेवाईकांनी केला आहे. पत्नी सतरा वर्षाचा मुलगा, विवाहित मुलगी आणि वृद्ध आई  असा परिवार आहे. त्याचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे झाला असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या बाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाले असून पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे

* दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल*

कशेले येथील रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी फाळके, यांनी सांगितले की पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित डॉक्टरांची चौकशी केली जाईल. दोशी असल्यास कारवाई करण्यात येईल मात्र या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर स्थानिकांनी प्रश्न उभे राहिले आहे..या कारणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Post a Comment

0 Comments