🌺 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌺
साहस, श्रद्धा आणि सेवा यांचा मूर्तिमंत अवतार असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्याला साष्टांग नमन!
त्यांनी राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण यांचा सुंदर समन्वय साधत जनतेसाठी आदर्श राज्यकारभार केला. भारतभरातील अनेक तीर्थक्षेत्रांचे पुनरुज्जीवन, गावे, रस्ते, घाट, धर्मशाळा यांची उभारणी आणि सर्वसमावेशक प्रशासन ही त्यांची ओळख बनली.
"स्त्री शक्तीची प्रेरणादायी दीपस्तंभ" म्हणून अहिल्याबाईंचं कार्य आजही प्रत्येक पिढीस मार्गदर्शक ठरतं आहे.
चला, त्यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन आपणही समाजहिताच्या वाटेवर निःस्वार्थपणे योगदान देण्याचा संकल्प करूया.
🙏 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना कोटी कोटी वंदन! करून संघटनेच्या अध्यक्षांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🙏
अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद.. (आरक्षी) पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या वतीने डिकसल येथील जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता त्यांच्या वैशाली सायबर कॅफे येथे साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, रा. जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, जिल्हा सदस्य श्री संतोष पवार, सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी मंगेश पडवळ, विलास सांबरी, आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments