अखंड पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेच्या वतीने कु. सृष्टी महेंद्र भोईर हीचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र वुमन्स प्रीमियर लीग रत्नागिरी जेन्ट्स संघात निवड झालेल्या
कर्जत तालुक्यातील डिकसल येथील राहणारी कुमारी सृष्टी महेंद्र भोईर हीची रत्नागिरी जेंट्स या संघात निवड झाली असून सृष्टी हिस या संघाची कर्णधार ही भारताची यशस्वी सलामीवीर स्मृती मंधना असून तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
प्रथमच निवड होण्याचा मान सृष्टी हिला मिळाला आहे. सृष्टी ही डिक्सल या गावच्या रहिवाशी असून महेंद्र भोईर यांच्या त्या कन्या आहेत.
कु.सृष्टी भोईरच्या या निवडीमुळे सर्व स्तरावरून सृष्टीचे अभिनंदन होत आहे. सृष्टीच्या या कामगिरीने तिच्या कुटुंबासह गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्या या यशाने स्थानिक खेळाडूंना प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जेंट्स संघात निवड झाल्याने तिला आता आणखीन चांगल्या संधी मिळण्याची अपेक्षा आहे.
त्यासाठी सृष्टी ही आपले अथक प्रयत्न करून पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. तिच्या या निवडीमुळे तालुक्यात गावात तसेच नातेवाईकांमधून सृष्टी हिला शुभेच्छांचा वर्षाव व तिचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. यावेळी संघटनेच्या वतीने सृष्टी हिला सन्मान पत्रक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली.संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, रा जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, तसेच तीचे काका स्पोर्ट शिक्षक श्री संतोष भोईर,रा. जिल्हा सदस्य संतोष पवार, आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments