पाण्याचा अंदाज न आल्याने पाली धरणात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू.
कर्जत तालुक्यातील पाली भुतीवलितील लघुपट बंधारे येथे पर्यटनासाठी मुंबई गोवंडी येथील तिन तरुण आले होते.
त्या तीन तरुणांपैकी दोन तरुण पाण्यात अंघोळीसाठी उतरले.
या तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने धरणाच्या पाण्यात बुडाले. स्थानिक आदिवासी व पोलीस पाटील यांनी आणि नेरळ पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने पाण्यात बुडलेले तरुण खालीद शेख व इब्राहीम खान यांना साधारण 20ते 25 फूट खोल पाण्यातून बाहेर काढण्यासात आले, तोपर्यंत दोन्ही तरुणांचा पाण्यात मृत्यू झाला होता.
नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे यांनी दोन्ही मृतदेह शववीच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.या महिन्यातील हि दुसरी घटना घडली आहे.

Post a Comment
0 Comments