अखंड पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद... पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली ,यांच्यावतीने मा .भाऊसाहेब राऊत विद्यालय डिकसल येथील १० वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला.
संघटनेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघ डिक्सल अध्यक्ष काशिनाथ पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
ग्रुप ग्रामपंचायत उमरोली हद्दीतील डिक्सल येथील हनुमान मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक काशिनाथ पाटील यांच्या हस्ते मारुतीरायाला हार घाऊन पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
यावेळी सोनार गुरुजी यांनी मुलांबद्दल मुलांच्या कामगिरीबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त केले त्यानंतर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे यांनी देखील मनोगत व्यक्त करून उत्तीर्ण झालेल्या मुलांचं आणि त्यांच्या आई-वडिलांच अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
या सत्कार कार्यक्रमात पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री काशिनाथ पाटील यांच्या हस्ते कुमार श्रेयस हेमंत ठोंबरे प्रथम क्रमांक ९६:२०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच सन्मान पत्रक, मेडल, ट्रॉफी, बुक,आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. अश्या भाऊसाहेब राऊत विद्यालय मधील १) श्रेयश हेमंत ठोंबरे ९६:२०%, २) नुपूर राजाराम रसाळ ९३:२० %, ३)रिद्धी राजू शिर्के९०:८०. %, ४)जानवी दिलीप राणे ८९:६०%, ५)वेदांत अरुण मोरे ८७ :६०% या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावे मुलांना देखील पाल्याला मिळालेल्या यशाचे कौतुक वाटत होते. त्यांच्या या यशाचं सर्वत्र आनंद साजरा केला जात आहे. या कार्यक्रमात मुलांचे आई वडील उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला त्या नंतर ज्येष्ठ नागरिक काशिनाथ पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन केले यावेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगळे, प्रदेश युवक अध्यक्ष सुप्रेश साळोखे, जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव , समाज भूषण सचिन बुवा लोंगळे, राजेश ठोंबरे, राणे मॅडम, राजू शिर्के , अा र पी आय शाखा अध्यक्ष मधन हिरे, युवा नेते पारस साळोखे, ई. उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments