सर्व नागरिक आणि देशवासीयांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
*🟣१२/०५/२०२५- बुध्दपौर्णिमा...🙏*
*बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे... हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात.....*
संघटनेच्या रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव यांचे कार्यालय वैशाली सायबर कॅफे येथे आयोजन करण्यात आले होते.
*यातील अनेक देशात बुद्ध पौर्णिमेची सार्वजनिक सुट्टी असते... भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.....*
*बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात... बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका- बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो.....*
*बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार या ठिकाणी एक महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते... हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबधित असले, तरी बौद्धांसह आजूबाजूच्या परिसरातील अन्य लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात व येथील बुद्ध विहारात आस्थापूर्वक पूजा करतात. या विहाराचे महत्त्व गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणा शी जोडले गेले आहे. या विहाराचे स्थापत्य अजिंठा लेणी सारखे वाटते.
*बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायी घरांमध्ये दिवे लावतात... घरे फुलांनी सजवतात. बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण केले जाते. विहारातील तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते. बोधिवृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते. वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे.....*
*बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थी सर्वांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात, तिथेही येऊन लोक प्रार्थना करतात... या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी बौद्ध परंपरेतील लुंबिनी, सारनाथ, गया, कुशीनगर, दीक्षाभूमी अशा पवित्र धर्मस्थळांना जाऊन प्रार्थना व पूजा करतात. बौद्ध धर्माशी संबंधित सूत्रे, त्रिपिटके यातील भागांचे वाचन व पठण केले जाते. व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवास केला जातो. दानधर्म केला जातो.....*
*या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात... वेगवेगळ्या देशात तेथील रीति- रिवाज आणि संस्कृतिनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रीलंका तसेच अन्य आग्नेय आशियायी देशात हा दिवस 'वेसक' उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा 'वैशाख' शब्दाचा अपभ्रंश आहे..
यावेळी संघटनेचे प्रदेश कमिटी अध्यक्ष यांच्या हस्ते प्रतीमेश पुष्प हार घालण्यात आले त्या नंतर सर्व सदस्यांनी प्रार्थना करून नात्नस्त झाले यावेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, यांच्या उपस्थितीत पार पडला, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री डॉ विशाल बनसोडे, युवक अध्यक्ष कु सूरज चव्हाण, सेल उपाध्यक्ष गोविंद संबरी, जिल्हा सदस्य संतोष पवार, शांताराम मिर्कुटे, मंगेश पडवळ, विलास सांबरी, अन्य उपस्थित राहून कार्यक्रम पार पडला.

Post a Comment
0 Comments