Type Here to Get Search Results !

मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त श्री देवेन भारती यांची नियुक्ती...

  आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
   १९९४ च्या बॅचचे अधिकारी असलेले भारती यांनी यापूर्वी मुंबईत विशेष पोलीस आयुक्त , संयुक्त पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आणि अँटि टेररिझम स्कॉड (ATS) चे प्रमुख म्हणून काम केले आहे.
   विवेक फणसालकर यांच्या निवृत्तीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून श्री देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.
  श्री.देवेन भारती यांच्या नियुक्तीमुळे मुंबई पोलीस दलात महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. देवेन भारती यांनी २६/११ च्या दहशदवादी  हल्ल्याच्या तपासासह अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास केला आहे. देवेन भारती यांची नियुक्ती शहरातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
 


Post a Comment

0 Comments