Type Here to Get Search Results !

कु. सृष्टी महेंद्र भोईर हीची महाराष्ट्र वुमेन्स प्रीमियर जेन्ट्स संघात निवड...


   कु. सृष्टी महेंद्र भोईर यांची महाराष्ट्र रत्नागिरी जेंट्स संघात निवड.  
   कर्जत प्रतिनिधी / ; कर्जत तालुक्यातील डिकसल येथे  राहणारी कुमारी सृष्टी महेंद्र भोईर यांची रत्नागिरी जेंट्स या संघात निवड झाली असून सृष्टी हिस या संघाची कर्णधार ही भारताची यशस्वी सलामीवीर स्मृती मंधना असून तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
प्रथमच निवड होण्याचा मान सृष्टी हिला मिळाला आहे. सृष्टी ही डिक्सल या गावच्या रहिवाशी असून महेंद्र भोईर यांच्या त्या कन्या आहेत.

सृष्टी भोईरच्या या निवडीमुळे सर्व स्तरावरून सृष्टीचे अभिनंदन होत आहे. सृष्टीच्या या कामगिरीने तिच्या कुटुंबासह गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्या या यशाने स्थानिक खेळाडूंना प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जेंट्स संघात निवड झाल्याने तिला आता आणखीन चांगल्या संधी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी सृष्टी ही आपले अथक प्रयत्न करून पुढे जाण्यासाठी  प्रयत्नशील आहे. तिच्या या निवडीमुळे तालुक्यात गावात तसेच नातेवाईकांमधून सृष्टी हिला शुभेच्छांचा वर्षाव  व तिचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments