चेन्नई एक्सप्रेस मधील 29 मुलांची फरपट. सामान्य डब्यातून 29 बालकांचा संश्यस्पद प्रवास.
कर्जतची खान / प्रतिनिधी ; मुंबई कडून चेन्नई कडे जाणाऱ्या एक्सप्रेसच्या सामान्य डब्यात शिक्षकांसोबत प्रवास करणाऱ्या 29 बालकांची संशयामुळे फरपट झाल्याची घटना समोर आली आहे चेन्नई एक्सप्रेस मधून शुक्रवारी शिवसेना नेत्या आकांक्षा शर्मा सावंत व सामाजिक कार्यकर्त्या सेजल नागावकर या प्रवास करत होत्या यावेळी सामान्य डब्यात 29 बालकांसोबत प्रवास करणारा संशयस्पद व्यक्तीची माहिती त्यांनी तत्काळ रेल्वे जीआरपीला दिली .
यानंतर कर्जत स्थानकावर पोलिसांनी ही गाडी थांबवून संबंधित इस्मासह सर्व मुलांना खाली उतरविले तपासणी दरम्यान मोहम्मद जलाल उद्दीन सिद्दिकी वय 28 हा बिहारच्या आररीया जिल्ह्यातील रहिवासी स्वतःला मदरशामध्ये शिक्षक असल्याचे सांगत ही मुले त्याचे नातेवाईक असून कर्नाटककातील रायचूर मधील एका मदर्समध्ये कुराण व उर्दू शिक्षणासाठी नेत असल्याचे सांगितले मात्र संशयंतून या मुलांना कर्जत येथील बालगृहात हलवण्यात आले आहे.
मात्र तपासात ही मुले शिक्षणासाठी जात असल्याचे आढळून आले दरम्यान सोमवारी बालकल्याण समिती समोर होणाऱ्या बैठकीत या मुलांची अधिकृत सोडवणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे फक्त संशयामुळे या मुलांची फरपट झाल्यामुळे दरम्यान ही मुले शिक्षणासाठी बिहार ते कर्नाटक जात असल्याचे उघड झाले असून यामध्ये कोणताही गैरप्रकार झाला नसल्याची माहिती बालगृहाचे अधीक्षक योगीराज जाधव यांनी दिली.

Post a Comment
0 Comments