कर्जत प्रतिनिधी/; कर्जत तालुक्यातील मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या दोन शाळेय मुलींवर स्कूल बसमधील क्लिनरने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाव वदप येथील किरण पाटील रा.वदप, ता. कर्जत, वय २४, याच्या वर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी तत्काळ आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पिडीत मुलीने आपल्या पालकांना सर्व प्रकार सांगितल की स्कूल बस मधील क्लिनर करण पाटील हा ड्रायव्हरच्या मागील सिटवर बसायला लावत असे, त्यानंतर त्यांना मांडीवर बसऊन त्यांच्या खाजगी भागांना अश्लीलरित्या स्पर्श करायचा, जर त्यांनी बसायला नकार दिला तर तो त्यांना मारहाण करायचा हा प्रकार गेल्या वर्षांपासून सुरू असल्याचे मुलींच्या पालकांनी सांगितले आहे.
या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून शाळेची बस आता सुरक्षित आहे का? असा सवाल पालकांमध्ये निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची गंभीर बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पिढीत मुलींच्या पालकांवर दबाव टाकण्याचा आरोप पीडितांच्या आई ने केला आहे. त्या मुळे अधिकच तीव्र संताप वाढला असून नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आरोपी करण पाटील याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील पदाधिकारी यांनी आरोपीस कठोर शिक्षा व्हावी म्हणून निवेदन देण्यात आले आहे.हे निवेदन पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्फत अलिबाग पोलिस अधीक्षक साहेब यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव, वार्ड अध्यक्ष ओंकार घरत. यांच्या निवेदन देण्यात आले .


Post a Comment
0 Comments