Type Here to Get Search Results !

कर्जत महसूल विभाग, तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांची दबंग कारवाई... लाल मातीचे भरून जाणारे हायवा ट्रक .....


 प्रतिनिधी / ;  कर्जत तालुक्यात काही महिन्यांपूर्वी रुजू झालेले तहसीलदार. डॉ धनंजय जाधव यांनी कर्जत तालुक्यातून तस्करी होत असलेल्या लाल मातीचे रॅकेट उध्वस्त केले आहे.

सोमवारी सर्व कर्जत तालुका झोपे गेलेला असताना मध्ये रात्री साडेअकरा  ते चार या वेलेल लाल मातीचे तस्करी करणारे हायवा ट्रक त्यांच्यावर धाडी टाकून  ताब्यात घेतले आहे.

कर्जत महसूल कार्यालयाने तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली लाल मातीने भरलेल्या तीन गाड्या पोलीस ठाण्यात नेल्या. तर अन्य तीन गाड्यांच्या टायर मधील हवा काढून सहा रिकाम्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली. कर्जत तहसीलदार यांच्या दबंग कार्यवाही बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

    कर्जत तालुक्यात जंगल भागात गेले वर्ष भर सुरू असलेली लाल मातीची तस्करी करणाऱ्या किटचा पर्दाफाश केला.

    ग्रामीण व आदिवासी भागातून वर्षभरात दररोज लाल माती भरून मुंबईकडे जाणारे ट्रक तेथील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. हा सर्व खेळ रात्री १० वाजे पासून पहाटेपर्यंत सुरू असल्याने रात्रीच्या अंधारात आपल्याला काही नुकसान होऊ नये म्हणून धावणाऱ्या ट्रक पुढे कोणी येत नव्हते आणि लाल माती घेऊन जाण्याचा ट्रक बद्दल कोणी बोलत नव्हते. मात्र समाज माध्यमांवर कर्जत तालुक्यातील . नांदगाव ,खांडस, ओलमन, भागातून असे लाल माती दररोज घेऊन जात असल्याच्या चर्चा दिसून येत होत्या. तर त्यावेळी कोणी तक्रार केली तर महसूल विभागाचे तलाठी थातूरमातूर कारवाई करत होते. मात्र एकदाही लाल माती घेऊन जाणारा ट्रक प्रशासनाने पकडला नव्हता.

 कर्जत तालुक्यातून दररोज 10 ते 40 हायवा ट्रक लाल माती घेऊन जात असल्याचे आढळून आले होते. त्यात महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून कोणती ही कारवाई होत नसल्यामुळे राजकीय आशीर्वाद असल्याचे बोलले जात होते तक्रारी करून देखील एकही पोलीस व महसूल प्रशासनाच्या सपडत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत होते. खांडस आणि ओलमन या तीन ग्रामपंचायती जमिनीमधील काढलेली लाल माती घेऊन जाणारे ट्रक हे मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्याने कर्जत आणि तेथून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग असा प्रवास करून जात होते.

Post a Comment

0 Comments