Type Here to Get Search Results !

*श्री रामनवमीच्या मुहूर्तावर कर्जत तालुक्यातील दहीवली परिसरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीचे उद्घाटन.. अनेक दिग्गजजांची हजेरी


__*श्री रामनवमीच्या मुहूर्तावर दहीवली कर्जत परिसरातील प्रभू श्री रामाच्या मूर्तीचा उद्घाटन सोहळा संपन्न.._________________________
       
  कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्य सम्राट मा श्री आमदार महेंद्रसेठ थोरवे यांच्या प्रयत्नातून..
   प्रतिनिधी /कर्जत ;  काल दि.6 एप्रिल 2025 रोजी,कर्जत- दहिवली परीसरातील गणेशघाटावर,श्रीराम नवमीचा मुहूर्त साधून प्रभू श्रीरामाच्या मुर्तीचा उद्घाटन सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला यावेळी श्रीराम मूर्तीच्या साक्षीने भक्तिमय वातावरणात होम-हवन सोहळ्याला सुरुवात झाली.कर्जत-खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा.महेंद्रशेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "प्रभू श्रीराम प्रती आयोध्या" या भव्य अध्यात्मिक संकल्पनेतील श्रीराम मूर्तीच्या उद्घाटन सोहळ्याला,गणेशघाट,दहिवली-कर्जत येथे अभिषेक व शास्त्रोक्त होम-हवन पध्दतीने सकाळी 8.00 वाजता सुरुवात झाली होती.यावेळी विद्वान ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारांनी संपूर्ण परिसरात भक्तिभाव, सात्विकता आणि दिव्यतेचे वातावरण निर्माण झाले होते.

     अनुप साबणे सारख्या नवख्या कॉन्ट्रक्टरने साकारलेल्या श्रीराममूर्ती परीसरातील श्रीरामाच्या मूर्तीला वंदन करण्यासाठी आलेल्या कर्जत शहरातील अनेक श्रद्धावान जोडप्यांनी यावेळी या पवित्र यज्ञामध्ये सहभागी होण्याचा मान मिळवला.तर भक्तगणांनी प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तीसमोर नतमस्तक होण्यासाठी मोठी गर्दी केली होती....भगव्या पताका,रामनामाचा गजर आणि शंखध्वनीने संपूर्ण गणेश घाट परिसर राममय झाला...जणूकाही प्रभू श्रीरामाचे साक्षात आगमन झाल्यासारखे चित्र या परीसरात निर्माण झाले होते.

    सायंकाळी प्रभु श्रीरामाच्या मुर्तीचे अनावरण करण्यासाठी,ऋषिकेश काळे आणि सहकारी यांच्या नावाजलेल्या " मार्तंड" या ढोल-ताशांच्या पथका सोबत आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि श्री.श्री.1008 महामंडलेश्वर श्री. महंत चंद्रदेवदासजी महाराज (गुरु कमलदासजी महाराज, कल्याण) यांचेसह प्रभू श्रीराम,सीतामाई,लक्ष्मण,हनुमान या वेशभूषेतील बालकलाकारांचे आगमन झाले तेव्हा अवघा परीसर राममय झाला होता...रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती ....भगव्या रंगाच्या पताकांनी आणि सजावटीनी सजलेल्या या परीसरात बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वसा घेतलेल्या "महेंद्र" नावाच्या शिलेदाराने दिमाखाने प्रवेश केला तेव्हा उपस्थितांनी " जय श्रीराम"या जय घोषात त्यांचे स्वागत केले. 

    दरम्यान भाजपात पक्ष प्रवेश करून अखंड हिंदुत्वाची कास धरलेले माजी आमदार सुरेशभाऊ लाड हे सुध्दा आमदार महेंद्रशेठ यांचे सोबत या सोहळ्याला उपस्थित राहील्याने समस्त हिंदूजन सुखावले होते...तर " मन हो राम रंगी रंगले" या सुमधूर आणि भक्तीरसानी रंगलेल्या विवेक भागवत यांच्या कार्यक्रमाने रसिकजन सुखावत असताना दुसरीकडे या सोहळ्याच्या कार्यक्रमावर बोट ठेवणारे भाजपाचे काही बेगडी कार्यकर्ते  सोशल मिडीयाच्या माध्यमातून टिका करत होते....परंतू त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून माजी आमदार आणि भाजपा नेते सुरेशभाऊ यांनी आमदार महेंद्रशेठ यांच्या कार्याची स्तुती तर केलीच परंतू सवयीप्रमाणे समस्त कर्जतकरांच्या पाणी प्रश्नावर या समयी भाष्य करून चिमटाही काढला.

     *खरेतर गेल्या 5/6 वर्षात आमदार महेंद्रशेठ यांचा विजयी अश्वमेघ रथ ज्या पध्दतीने चौफेर उधळला आहे ते विरोधकांना तर सहन होत नाहीच परंतु मित्रपक्षातील,पक्षनिष्ठेच किंवा हिंदुत्वाच सोंग घेतलेल्या काही तथाकथित नेते मंडळींना रूचत नाही हे ही तितकच खरं आहे.त्यामुळे आमदारांच्या चांगल्या कार्याचा गौरव न करता,सोशल मिडीयाच्या माध्यमातून उंगल्या करायचे काम ही मंडळी करत आहे.हे दुर्देव्यी असून मित्रपक्ष म्हणून आमदारांच्या व्यासपिठावर मिरवणारे भाजपाचे नेतृत्व आपल्या पक्षातील अशा बंडखोरांना,आमदारांविरूध्द बोलताना का रोखू शकत नाही हे सुध्दा न कळण्यासारखे आहे.*

     दरम्यान या संपूर्ण कार्यक्रमाचे शिवधनुष्य उचलून हा कार्यक्रम यशस्वी करणारे आणि कर्जत शहराच्या विकासासाठी रात्रं-दिवस झटणारे माजी नगरसेवक संकेत भासे व त्यांचे सहकारी अभिषेक सुर्वे,दिनेश कडू आणि टीमचे या यशस्वी कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल कौतुक केले जात आहे.

      या कार्यक्रमासाठी संतोषशेठ भोईर,भाई गायकर,मनोहर थोरवे,शरद लाड,राजेश लाड,विजय पाटील,राहुल डाळींबकर,संभाजी जगताप,राजेश भगत,शिवराम बदे,दिलीप ताम्हाणे,दिपक बेहरे,मंगेश म्हसकर अशोक ओसवाल,योगेश पोथरकर,विश्वनाथ थोरवे,प्रसाद थोरवे,पंकज पाटील,नितीन कांदळगांवकर,मिनाताई थोरवे रोहीत विचारे,सुदेश देवघरे,प्रदिप वायकर,नदीम खान,बैजू घुमरे,राजेश लाड,स्वप्निल जाधव,राकेश दळवी,विशाल जोशी,साईनाथ श्रीखंडे,जनार्दन भासे,विकास चित्ते,मल्हारी माने,सुनिल जाधव,नाना कर्णुक,नंदू गुरव आदी.मान्यवर उपस्थित होते तर समस्त थोरवे परीवार, दहिवलीकर ग्रामस्थ आणि कर्जतकर नागरीकांनीही यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली होती.

Post a Comment

0 Comments