गो हत्या प्रकरणी नागरिकांमध्ये , बजरंग दल . यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटना आक्रमक. कर्जत पोलिस स्टेशन आणि कर्जत / खालापूर मतदार संघाचे आमदार यांना दिले निवेदन.
कर्जत / प्रतिनिधी ; कर्जत तालुक्यातील .सावेले गावात गोहत्या प्रकरणातील आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी...
मा महेदय, वरिष्ठ पोलिस निरीक्षक साहेब, कर्जत तसेच कर्जत खालापूर चे आमदार महेंद्र थोरवे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
तालुक्यातील सावेले गावातील गोहत्या प्रकरणात असलेल्या व्यक्तीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी या साठी तालुक्यात सर्वच स्तरावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गोधन हत्या हे कृत्य खूप भयानक आहे, या अगोदर देखील काही भागात असे प्रकार उघडकीस आले आहेत. परंतु अताची घटना खूप गंभीर असल्यामुळे तालुक्यात पुन्हा अशी घटना घडू नये याकरिता आरोपीस खूप मोठ शासन शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपणास विनंती करण्यात येत आहे...
अ . पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद.. (आरक्षी) पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जत वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री सुरेन्द्र गरड, तसेच कर्जत खालापूर चे आमदार यांना निवेदन देऊन आरोपीस चांगलेच शासन घडावे यासाठी कठोर शिक्षा व्हावी म्हणून संघटनेचे प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे , जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, ता उपाध्यक्ष रामदास तुपे, ता सहसचिव मनेश ठानगे, सेल उपाध्यक्ष सुनील गोरे. ई उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments