Type Here to Get Search Results !

खालापूर पोलिस ठाण्यात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने....

 


   महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्ताने खालापूर पोलीस ठाण्यात जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.

   पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या आगळ्यावेगळ्या मानवंदने मुले संपूर्ण खालापूर परिसरात एक आनंदातच वातावरण निर्माण झाले आहे.

   या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव सहाय्यक फौजदार मोहन भालेराव प्रकाश वाढवे, रवींद्र सोनवणे तसेच अंमलदार राहुल गायकवाड पंकज खंडागले निलेश कांबळे स्वप्नाली पवार चंदा गायकवाड निलेश सोनवणे सतीश जमधने, अमित सावंत संगीता भगत कीर्ती कांबळे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

    या विशेष प्रसंगी खालापूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सचिन पवार व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे भव्य व सुंदर अनावरण करण्यात आले या कार्यक्रमात पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.

     यांच्या या प्रयत्नामुळे या कार्यक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी हा कार्यक्रम पार पाडला या जयंती उत्सवानिमित्ताने अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या देवदूत टीमला माननीय सचिन पवार यांनी आमंत्रित करून उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला खालापूर परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. त्यामुळे या उपक्रमाने पोलीस ठाण्यात एकात्मता निष्ठा व आदराची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे  खालापूरकरांकडून  कडून कौतुक


Post a Comment

0 Comments