Type Here to Get Search Results !

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, संघटनेच्यावतीने "सन्मान नारीचा नारी शक्तीचा २०२५" ने सन्मानित करण्यात आले.

 

    जागतिक महिला दिनानिमित्त संघटनेच्या माध्यमातून महिलांचा सन्मान. मुख्य उद्देश समाजात महिलांबद्दल जागृकता पसरवणे ,
आज महिला प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहेत.
    .महिला दिन हा जगात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो .महिलांच्या आत्मसन्मानाचा दिवस. महिलांची ध्येय संकल्प आणि उद्दिष्टांची मनोकामना करण्याचा दिवस. या दिवशी महिलांना एक आत्मप्रेरणा मिळते.
    दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी साजरा केला जात आहे. समाजात महिलांबद्दल आदराची भावना निर्माण करणे आणि त्यांना पुरुषानं प्रमाणे समान अधिकार मिळवून देणे. हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
जागतिक महिला दिनाच्या दिवशी विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालय, कार्यालये, इत्यादी ठिकाणी कार्यक्रम केले जातात. या महिला दिनी आपण सर्वांनी महिलांच्या योगदानाचा आणि अधिकारांचा आदर केला पाहिजे.

    आज महिला प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहे. शिक्षण असो, विज्ञान असो, क्रीडा असो, राजकारण असो, उद्योग व्यवसाय, उद्योजकता असो, सर्वत्र महिला आपले कर्तव्य सिद्ध करत आहेत. आपण महिलांचा आदर केला पाहिजे. त्यांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी दिली पाहिजे.
या महिला दिनी आपण महिलांच्या हक्काचे रक्षण करण्याची आणि समाजात महिलांप्रती समानतेची भावना बसवण्याची शपथ घेतली पाहिजे. 
   समान समृद्ध समाजाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन या दिशेने काम केले पाहिजे. 
अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद. आरक्षी फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या वतीने आज जागतिक दिनाच्या निमित्ताने कर्जत खालापूर तालुक्यातील महिलांचा सन्मान करण्यात आला.

    "सन्मान नारीचा, सन्मान श्री शक्तीचा "2025 ने समाजातील . सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा व सामाजिक स्तरावरील सर्वच महिलांचा तसेच अशासेविका, अंगणवाडी सेविकां, कर्मचारी, मदतनीस, जिल्हा परिषद शिक्षिका तसेच नर्स यांचा सन्मान करण्यात आला. महिलांच्या बद्दल आदर भाव व्यक्त केला. महीलांबद्द्दल जागरूकता पसरवणे व आदर करणे. यावेळी संघटनेचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे , प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, सल्लागार उत्तम ठोंबरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष सदावर्ते डॉ सेल, युवक जिल्हा अध्यक्ष कु प्रफुल जाधव, जिल्हा कमिटी अध्यक्ष सुभाष ठानगे, जिल्हा सदस्य संतोष पवार, कर्जत तालुका युवक अध्यक्षा प्राची जाधव, उमरोली जिल्हा परिषद शाळा कमिटी अध्यक्ष भजन संगीतकार सचिन लोंगळे, सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments