Type Here to Get Search Results !

अखेर कर्जत चारफाटा सर्कल वरील खड्डे झाले मुक्त., आमदार थोरवे च कौतुक व आभार...

 


    नागरिकांनी मानले आमदार साहेबांचे आभार, संघटनेच्या माध्यमातून दिलेल्या निवेदनाचं होतंय कौतुक. नगरसेवक एड .संकेत भासे यांचा पुढाकार त्यांचं होतय अभिनंदन... जनतेच्या त्रासाला धाऊन येणारे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे...

 कर्जत / प्रतिनिधी ; कर्जर तालुक्यातील चार फाटा मुख्य सर्कल या ठिकाणी पडलेले मोठ्या संख्येनं खड्डे या संदर्भात स्थानिक नागरिक, तसेच तालुक्यातील वाहन चालक,आणि बाहेरून येणारे पर्यटक त्यातच दर शनिवार रविवार होणारे ट्रॅफिक जाम समस्या यांसागल्यांच्या समस्यांवर तोडगा निघणे महत्त्वाचे आहे त्या साठी अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद आरक्षी पोलिस फ्रेंड असोसिएशन च्या वतीने पी डब्लुडी (PWD) कार्यालय कर्जत यांना संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिले होते, कर्जत मध्ये येण्यासाठी मुख्य रस्ता कर्जत चारफाटा सर्कल येथील खड्डे भरणे अन्यथा रस्था रोको आंदोलन करण्यात येईल या दृष्टीने अधिकारी यांना सांगण्यात आले होते, कर्जत उपविभागीय अधिकारी यांनी ते आमच्या कडे नसल्याचे सांगितले आणि म एस आर डी सी कडे असल्याचे सांगितले आणि त्यांच्या शी संपर्क साधून येत्या काही दिवसातच खड्डे भरले जातील असे आश्र्वासन दिले. 

  या साठी नागरिकांनी ही तागा लावला होता. अगोदरच कर्जतचे सुशोभीकरण आणि पर्यटक कर्जत माथेरान बद्दलचे आकर्षण आमदार साहेबांच्या प्रयत्नांमुळे वाढले आहे. त्यातच कर्जत तालुक्यात एंट्री करतानाच मुख्य सर्कल येथील मोठे खड्डे यांनुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता परंतु आता सया त्रासातून सुटका झाली आहे. आमदार साहेबांचे आभार..

   खालापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी दखल घेऊन नगरसेवक एड संकेत भासे यांनी स्वतः अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कर्जत रहदारीच्या मुख्य रस्त्यावरील खड्डे भरून घेतले, तसेच कर्जत तालुक्यातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही, तसेच तालुक्यातील रस्ते हे चांगल्या प्रतीचे बनवले जातील याची खात्री दिली, त्यामुळे आमदार थोरवे यांचे व नगरसेवक यांचं कौतुक केले जात आहे, तसेच प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया यांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या रस्त्या संदर्भातल्या निवेदनाच्या बातम्या यांच्या मुले संघटनेचे आणि पदाधिकारी यांचं देखील कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. आमदार थोरवे साहेबांच ही अभिनंदन त्यांनी देखील नागरिकांच्या समस्या कडे लक्ष देऊन समस्या सोडवण्याच कार्य केले आहे..


Post a Comment

0 Comments