Type Here to Get Search Results !

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त शाळेय विद्यार्थींयांना शैक्षणिक साहित्य वाटप..

 "विद्या हे धन आहे हे श्रेष्ठ साऱ्या धनाहून तिचा साठा ज्यापाशी तो ज्ञानी मानिती जन "ज्ञानज्योती, क्रांतिज्योती. समाजसुधारक, शिक्षिका आणि कवयत्री सावित्रीबाई फुले. भारतातील पहिला महिला शिक्षिका म्हणून ओळखल जातं...
  

  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने  रायगड जिल्हा परिषद शाळा आंबिवली येथिल शालेय विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप..

  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी रा. जी. परिषद शाळा आंबिवली येथे साजरी करण्यात आली या वेळी .. संघटनेच्या संस्थापक श्री ज्ञानेश्वर साळोखे यांनी सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सावित्री बाई फुले यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले,

  सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखलं जातं. आपले पती महात्मा जोतिराव फुले यांच्या सोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावली. सावित्री बाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.

    "विद्या हे धन आहे हे श्रेष्ठसाऱ्या धनाहून तिचा साठा ज्यापाशी, तो ज्ञानी मानिती जन"सावित्री बाईंना ज्ञानज्योती, क्रांतिज्योती, या टोपण नावाने ओळखले जाते. तसेच त्या समाजसुधारक, शिक्षिका व कवयत्री होत्या.

  सावित्री बाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. अमानुष रुढी परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योती यांचे मन पेटून उठले . जोतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्री बाईने केले व खऱ्या अर्थानं सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली.

   अ. पोलिस मित्र सुरक्षा ऑफ इंडिया व हिंद (आरक्षी) पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या वतीने सावित्री बाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या वेळी शालेय मुख्यद्यापक दादाभाई नामदेव मोहिते संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, जिल्हा सदस्य संतोष पवार, सह सचिव मनेश ठानगे, शिक्षिका सौ तेजस्विनी मोहिते, सदाशिव डोलारे, अक्षय जाधव, ग्रामस्थ प्रदीप कराले, सौ कोमल कराले. उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments