Type Here to Get Search Results !

माथेरान मध्ये होळीच्या रात्री तीन सफाई कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी तर एका सफाई कामगाराचा मृत्यू...


 माथेरान मध्ये होळीच्या रात्री तीन स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये झाली हाणामारी तर एका स्वच्छता कर्मचारी चा मृत्यू, अधिक तपास पोलीस उपअधीक्षक डी डी टेले. यांच्या मार्गदर्शनाखाली  माथेरान पी आय अनिल सोनेने व पोलिस अधिकारी करत आहेत.

   प्रतिनिधी ( गोविंद ह. सांबरी)  ; माथेरान मध्ये होळीचा सण आनंदात साजरा होत असताना माथेरान रेल्वे रेस्ट हाऊस मध्ये रक्त रंजीत घटना घडली. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या झालेल्या वादातून एकाचा खून झाल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे.

   होळीच्या रात्री स्वच्छता कर्मचारी सुशांत गेजगे आणि प्रेम किशोर यांच्यात मोबाईल परत करण्यावरून वाद निर्माण झाला.

   सुरुवातीला दोघांमध्ये वाद निर्माण झाला त्यातून शिवीगाल सुरू झाली, आणि हा वाद हाणामारीत बदलला, त्यातच तीक्ष्ण हत्यारांसह हात बुक्क्यांचा वापर करून सुशांत गेजगे याला जबर मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सुशांत गेजगे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

   या घटनेची माहिती मिळताच माथेरान पोलीस  स्टेशनचे एपीआय अनिल सोनवणे आणि त्यांच्या पोलीस टीमने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी डी.डी. टेले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अनिल सोनेने पी आय गणेश गिरी, पोलीस दामोदर स्वतेले करत आहेत. या हत्याकांडामुळे  माथेरान मध्ये मोठी खळबळ उडाली असून अधिक तपास पोलिस यंत्रणा करत आहेत..

Post a Comment

0 Comments