Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद. .(आरक्षी) पोलीस फ्रेंड असोसिएशनच्या वतीने महिलांचा सन्मान...


   जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद. (आरक्षि) पोलीस फ्रेंड असोसिएशन यांच्यावतीने महिलांचा सन्मान.

    आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिस्सा व अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो तसेच तमाम महिला वर्गाला त्याच्या स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो

   महिलांच्या हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो.

    28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्क शहरातील सोशॅलिस्ट पार्टी ऑफ अमेरिका ने आयोजित केलेला महिला दिन हा सर्वात पहिला महिला दिवस.

     भारतात मुंबई येथे महिला दिवस 8 मार्च 1943 रोज साजरा करण्यात आला. आठ मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या समाजिक, आर्थिक, राजकीय सांस्कृतिस, परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले. तश्या स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका कार्यालयांमधूनही 8 मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.

   1975 या  जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले 1977 साळी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूनं साजरा करावा यासाठी आवाहन केले.

     संघटनेच्या माध्यमातून अशा सेविका, अंगणवाडी सेविका, कर्मचारी, शिक्षिका, मदतनीस, महिला बचत गट, यांना त्यांनी केलेल्या समाज कार्याची पोच पावती म्हणून सन्मान पत्रक गुलाबाचे फुल, देऊन सन्मानित करण्यात आले या वेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे, महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु. प्रफुल जाधव, जिल्हा सदस्य संतोष पवार, सह संघटक संतोष थोरवे, तालुका युवक महिला अध्यक्ष प्राची जाधव, तालुका सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी, तालुका सदस्य विलास सांबरी, अदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments