Type Here to Get Search Results !

हिंदवी स्वराज्य व मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप...


  छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून शौर्य, समता प्रेरणा आणि असतेचे केंद्र आहे. महाराजांचा प्रताप सूर्य चंद्रासारखा मोठा आहे, महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत.

   महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य व मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने हिंद.. पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली व अ. पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने जयंती निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची नुकताच 19 फेब्रुवारी 2025 रोजी तारखेनुसार जयंती साजरी झाली शिवाजी महाराजांच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती म्हणतात. त्यामुळे शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात दोनदा साजरी केली जाते.

     शिवरायांची कीर्ती तेवढी अंगाध आहे आणि त्यांचा प्रताप सूर्य चंद्रासारखा मोठा आहे. छत्रपती असे राजे होऊन गेले की, त्यांचा इतिहास अजरामर झाला आहे. शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात दोनदा साजरी होते. त्या दिवशी दिवसभर ढोल ताशे वाजवीत मिरवणुका निघतात आणि महाराजांच्या जीवन कार्यावर कार्यक्रम भाषणे त्यांच्या विचारांवर आधारित व्याख्याने केली जातात. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार आणि तिथीनुसार मोठ्या हर्शो उल्हासात आणि आनंदोउस्त्स्वत जयंती साजरी केली जाते.

     छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून शौर्य समता प्रेरणा आणि असतेचे केंद्र आहे.

     या जयंती निमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा बेकरेवाडी, व रायगड जिल्हा परिषद शाळा  आसल वाडी येथे पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद आरक्षण पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या माध्यमातून मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्याचप्रमाणे प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले व रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु. प्रफुल जाधव यांच्या हस्ते महापुरुषांना पुष्पहार घालण्यात आले. त्यानंतर  शालेय विद्यार्थ्यांना महाराजांच्या जीवना बद्दल थोडक्यात माहिती सांगून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले, प्रदेश सल्लागार उत्तम भाई ठोंबरे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु. प्रफुल जाधव, जिल्हा सदस्य संतोष पवार,तालुका सहसंघटक संतोष थोरवे, तालुका सहसचिव मनेश ठाणगे, सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी, उपाध्यक्ष सुनील गोरे, सदस्य विलास सांबरी, डॉ.विशाल बनसोडे, शालेय शिक्षक, ग्रामस्थ, गोविंद सांबरी, चंद्रकांत सांबरी, रमेश सांबरी, आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments