दर वर्षी प्रमाणे याही वर्षी २०२५ समाजभूषण पुरस्काराचे आयोजन अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या प्रदेश कार्यालय कर्जत येथे आयोजित करण्यात आले होते.
या वेळी या वर्षीच्या पुरस्कारात भजन, भारुड, गवळणी, जनजागृती या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री.केशव बुवा तांडेल. यांस "2025 समाज भूषण" पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.४० वर्षा पासून भजन क्षेत्रात खूप मेहनत घेऊन आपला ठसा उमटविला आहे. अनेक लहान थोराना घडविले व मार्गदर्शन केले. केशव बुवांनी तालुक्यात अनेक शिष्य घडविले. नेहमीच प्रसिद्धीपासून दूर असणारे श्री केशव बुवा तांडेल यांचे पेन,अलिबाग,कर्जत, खालापूर मध्ये अनेक डबल बारीचे कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या आवाजात जादू आहे, त्यांनी आपल्या आवाजाने नागरिकांना भुरळ पडली आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नाने जिद्द चिकाटी परिश्रमाच्या जोरावर वयाच्या ७०/७५ वर्षी, केशव बुवा तांडेल यांच्या कार्याची माहिती दखल घेऊन या वर्षीचा "२०२५ समाजभूषण पुरस्कार"केशव बुवा तांडेल यांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. बुवांनी समाजात अनेक कार्यक्रम पार पडली आहेत दुःखात, सुखात सहभागी राहून, समाज प्रबोधन करणे, मार्गदर्शन, समाज सेवा, यांसारखे अनेक कार्यक्रम त्यांनी हाती घेतले.
अखंड पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद. (आरक्षी) पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या वतीने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु.प्रफुल जाधव व समाजभूषण श्री. सचिन बुवा लोंगले यांच्या हस्ते देण्यात आला आहे, मिळालेल्या पुरस्काराने तांडेल बुवांच नातेवाईक मित्र मंडळ यांच्या कडून सर्वत्र कौतुक केले जात आहे. बुवांनी सर्वांचे आभार मानले आहे. 🙏


Post a Comment
0 Comments