अश्लील हावभाव करून पसार झालेल्या व्यक्तीस आखेर अटक.
नेरळ पोलिसांचं होतय कौतुक.
कर्जत प्रतिनिधी / कर्जत कल्याण राज्य मार्गावर रस्त्यावर असलेल्या डिकसल येथील रायगड हॉस्पिटल रिसर्च सेंटर येथून जात असलेल्या तरुणीला पत्ता विचाराच्या बहान्याने थांबऊन अश्लील हावभाव करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संबंधित तरुणीने नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान तरुणी समीर अश्लील हावभाव करून बोलून केलेल्या तरुणाला तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन ताब्यात घेतले.
नेरूळ पोलीस ठाण्याचे प्रभारी शिवाजीराव ढवळे व महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पागे यांच्या पथकाकडे पुढील तपास दिला. कर्जत कल्याण मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासे व त्यानुसार दुचाकी वरील नंबर वरून गाडीच्या मूळ मालकाचा शोध घेतला. त्या आधारे घटना घडल्यावर दीड तासाने पोलीस बदलापूरतील सोनीवली गावात पोचले. विजय चंद्रकुमार तेलगर वय ३४ याला मध्यरात्री १ वाजून ५९ मिनिटांनी त्याच्या दुचाकीसह ताब्यात घेऊन लेडीज पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. या घटना मुळे पोलिसांचे सर्वच ठिकाणी कौतुक केले जात आहे.

Post a Comment
0 Comments