Type Here to Get Search Results !

खोपोली येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन. अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली यांचा स्तुत्य उपक्रम..

   हीच खरी श्रद्धांजली आपल्या हातून सनाज कार्य व्हावे हीच खूप मोठी गोष्ट आहे.


 खोपोली येथे मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन, हिंद. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली व अ . पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेचा स्त्युत्य उपक्रम.

   दिवंगत सुलोचना बाळकृष्ण घोडके यांच्या स्मरणार्थ खोपोली येथील तक्षशिला बुध्द विहार मोहनवाडी येथे आयोजित करण्यात आले होते.

   अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद..(आरक्षी) पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..

दिवंगत सुलोचना बाळकृष्ण घोडके यांच्या स्मरणार्थ या आरोग्य शिबिरात आलेल्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळी तसेच अजू बाजूच्या परिसरातील नागरिकांनी आपला सहभाग घेतला. घोडके परिवाराच्या वतीने सौ. मिताली वाघमारे, वंचित बहुजन आघाडी खोपोली शहर, सौ. चंदा गायकवाड महाराष्ट्र पोलिस, सौ.मनीषा जाधव सामाजिक कार्यकर्त्या, डॉ. विशाल बनसोडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले.

    हीच खरी श्रद्धांजली आहे की आपल्या हातून चांगले समाज कार्य घडो, त्या अनुषगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी डोळे तपासणी, अपलदरत चष्मे वाटप, व अन्य सामान्य चाचण्या याचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश सल्लागार श्री उत्तम भाई ठोंबरे, जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, युवा कार्यकर्ता कु  विराज ठोंबरे, प्रवीण गायकवाड, अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments